फोटो सौजन्य- pinterest
देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो. विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. हा उत्सव भाद्रपद महिन्यात सुरु होतो आणि 10 दिवसांचा असतो. यावेळी सर्व भक्त आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करतात. तसेच विधिपूर्वक त्याची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीची सुरुवात कधी होत आहे ते जाणून घ्या
पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथीची सुरुवात मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1.54 वाजता होणार आहे. त्याच वेळी बुधवार, 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3.44 वाजता त्याची सांगता होईल. यावेळी गणेश चतुर्थी उत्सवाची सुरुवात 27 ऑगस्ट रोजी होणार आहे त्याच दिवशी गणपती बाप्पाची घरोघरी आणि मंडळामध्ये स्थापना केली जाईल. तर शनिवार, 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीपर्यंत हा उत्सव चालेल.
गणेशाची स्थापना करण्याचा सर्वात शुभ काळ म्हणजे दुपार. मान्यतेनुसार या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता. बुधवार, 27 ऑगस्ट रोजी मध्यान्हाच्या काळात गणपती बाप्पाच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11.05 ते दुपारी 1.40 पर्यंत असेल.
यंदा गणेश चतुर्थीचा दिवस खूप खास मानला जात आहे. कारण यावेळी गणेश चतुर्थीची सुरुवात बुधवारपासून होत आहे. जे शुभ मानले जाते. या दिवशी चार दिवस शुभ योग तयार होत आहेत. शुभ योग, शुक्ल योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग हे शुभ योग तयार होत आहे. तसेच हस्त नक्षत्र आणि चित्रा नक्षत्र देखील तयार होत आहे
गणेश मूर्ती घरी आणण्यापूर्वी बाप्पाची स्थापना करण्याचे ठिकाण स्वच्छ करुन घ्या. त्या ठिकाणी फुले, रांगोळी आणि इतर वस्तूंनी घरांची सजावट करा.
यावेळी शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पाची स्थापना करा.
चौरंगावर लाल किंवा पिवळा कपडा पसरवा.
पूजा सुरू करण्यापूर्वी हातात पाणी, फुले आणि तांदूळ घेऊन प्रार्थना करा.
सर्वप्रथम ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करून गणपती बाप्पाची आराधना करावी.
पंचामृताने गणेशाच्या मूर्तीला स्नान घालावे.
स्नान घातल्यानंतर नवीन कपडे आणि दागिने घालावे.
यासोबतच दुर्वा, जास्वंदाचे फूल, हळदी कुंकू, तांदूळ इत्यादी पूजेचे साहित्य अर्पण करावे.
पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाची आरती करावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)