फोटो सौजन्य - Social Media
गणपती बाप्पाला वनस्पतींमध्ये दुर्वा तर फुलांमध्ये जास्वंदाचे फुल चढवले जाते. तुम्हाला माहिती आहे का? इतर देवांसाठी वापरली जाणारी तुळशी, बाप्पाच्या अवतीभोवतीपण दिसत नाही. याचा मागे एक फार मोठी कथा आहे. मुळात, हा सर्व खेळ श्राप आणि उपश्रापांचा आहे. बाप्पामुळेच तुळशी आज इतकी पवित्र मानली जाते. तुळशीला आई मानून तिला पुजले जाते. बाप्पा सोडला तर इतर देवांच्या पूजेत तुळशीला फार मोठे मान आहे. पण बाप्पाच्या पूजेत, तुळशीचा वापर सहसा टाळला जातो. का? यामागे आहे मोठी कथा, चला तर मग जाणून घेऊयात:
एकदा बाप्पा ध्यान करत बसले होते. बाप्पाचे रूप इतके गोंडस आणि देखणे आहे की पाहताचक्षणी अगदी कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल. तेव्हा विंदा तेथेच उभी होती. बाप्पाला ध्यान करताना पाहून तिच्या मनात बाप्पांविषयी आकर्षण तयार झाले. क्षणाचाही विलंब न लावता, विंदाने बाप्पाला लग्नाची मागणी केली. बाप्पा तेव्हा ध्यानामध्ये व्यस्थ होते. विंदाने बाप्पाचे ध्यान तोडले त्यामुळे बाप्पाला तिचा फार राग आला. रागाच्या भरात बाप्पाने तिच्या मागणीचा स्वीकार केला नाही. ते ऐकून विंदाही प्रचन्ड तापली. इतकी की तिने बाप्पाला चक्क श्राप दिला.
श्राप असा की बाप्पाला एक नाही तर दोन लग्न करावे लागतील. हे ऐकून बाप्पाही प्रचंड तापला आणि त्यानेही विंदाला श्राप दिला की “तुझं लग्न एका असुराशी होईल.” विंदाला तिच्या चुकेची जाणीव झाली. पण दिलेला श्राप मागे घेता येत नाही. त्यामुळे बाप्पाने तिला दिला श्राप मागे घेता आला नाही. पण त्यावर तोडगा म्हणून बाप्पाने विंदाला तुळशीचे झाड तयार केले. तिला इतके पवित्र स्थान दिले की प्रत्येक देवांच्या पूजेत तिला मान मिळाला. पण बाप्पाने स्वतःच्या पूजेत तिचा स्वीकार करणार नाही असे ही सांगितले.
यांनतर तुळशीचे लग्न एका शंखचूर नावाच्या असुर सम्राटाशी झाले. आजच्या काळात, तुळशीला फार महत्वाचे स्थान आहे.