(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या स्वरपर्व आणि संगीतकार चिनार-महेश हे घेवून आले आहेत अष्टविनायकाची महिमा सांगणारे ‘महती अष्टविनायकाची’ धमाकेदार गीत. नुकतेच हे गीत प्रकाशित झाले असून गणेशभक्तांसाठी ही अनोखी संगीतमय मेजवानी ठरणार आहे.
आजपर्यंत विघ्नहर्ता श्री गणेशावर अनेक गाणी प्रसारित झाली आहेत आणि ती सर्व गाणी गणेशभक्तांनी डोक्यावरही घेतली आहेत. पण अष्टविनायकावर एखादंच गाणं प्रसारित झालं असेल. खासकरून सचिन पिळगांवकर यांच्या अष्टविनायक या १९७९ साली आलेल्या चित्रपटातील गाजलेल्या ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ या गाजलेल्या गीतानंतर अष्टविनायकावर लक्षात राहावं असं गाणं प्रसारित झालेलं नाही. परंतू गेल्या अनेक वर्षांची ही प्रतिक्षा संपवली आहे संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या स्वरपर्व या संस्थेनं. स्वरपर्व आणि अनुदीप माळवी यांनी प्रसिद्ध संगीतकार चिनार आणि महेश यांना घेवून ‘महती अष्टविनायकाची’ ही धमाकेदार ध्वनिचित्रफीत बनविली आहे. या ध्वनीचित्रफितीच्या सहनिर्मात्या ॲड. प्रणिता देशपांडे आहेत.
गजलकार संदीप माळवी यांच्या लेखनीतून हे गीत साकारलं असून प्रसिद्ध संगीतकार जोडी चिनार-महेश यांनी या गीताला अप्रतिम असा स्वरसाज चढविला आहे. नव्या पिढीचा गायक हर्षवर्धन वावरे आणि नव्या पिढीची गायिका सोनाली सोनावणे यांच्या सुरेल आवाजात हे गाणे सजले आहे. तरूण दिग्दर्शक अभिजीत दाणी यांनी ही ध्वनीचित्रफीतीचे दिग्दर्शन केले आहे. या ध्वनिचित्रफीतीमध्ये तरूणांचा आवडता अभिनेता आयुष्य संजीव आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रतिभा जोशी यांच्या नृत्याभियाने या गीताला वेगळ्या उंचीवर नेले आहे.
‘पीछे देखो पीछे’ व्हायरल मुलगा अहमद शाहवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला दिला निरोप
त्यांच्या जोडीला बालकलाकार शोर्या टोकरे हिने लक्ष वेधून घेईल असा नृत्याभियन केला आहे. या तिघांची केमिस्ट्रीने अष्टविनायक गीताला अधिक बहारदार बनविले आहे. नृत्याची किमया साधली आहे नृत्य दिग्दर्शक दिनेश शिरसाट यांनी. ग्रामिण भागामध्ये गणेशोत्वाचा त्यांच्या नृत्याच्या स्टेप्स भावभक्तीचा सुंदर अविष्कार आहेच पण संगीत आणि नृत्याच्या ठेक्यावर पाय थिरकायला लागतील अशी जादू या गीतामध्ये आहे.
“प्रेमासाठी अजून तयार…!” युजवेंद्र चहलसोबत घटस्फोटानंतर धनश्री वर्माची पहिली प्रतिक्रिया
विजय सोनावणे आणि चेतन भारिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही ध्वनीचित्रफीत बनविण्यात आली असून संगीत संयोजनाची महत्वाची जबाबदारी संकेत गुरव यांनी पार पाडली आहे. व्यवस्थापनाची जबाबदारी प्रियांका क्षत्रिय आणि अभिषेक क्षत्रिय यांनी नेटकेपणाने सांभाळली आहे. नुकतंच ‘महती अष्टविनायकाची’ हे गीत चिनार – महेश ॲाफिशियल या युट्युब चॅनेलवर प्रसारित होणार असून, सी एन एम म्यूजिक फॅक्टरी ह्या लेबल द्वारे तमाम गणेशभक्तांसाठी ‘महती अष्टविनायकाची’ हे गीत भारावून टाकेल असा विश्वास स्वरपर्वचे अनुदीप माळवी आणि संगीतकार चिनार-महेश यांनी व्यक्त केला आहे.