फोटो सौजन्य- istock
गुरु ग्रह सध्या मिथुन राशीमध्ये विराजमान आहे. पण तो आज सोमवार, 9 जून रोजी दुपारी 4.12 वाजता मावळणार आहे. त्यानंतर 9 किंवा 10 जुलैपर्यंत अस्त राहण्याची शक्यता आहे. गुरु ग्रहाच्या या अस्ताचा परिणाम सर्व 12 राशीच्या लोकांवर होऊ शकतो. या परिणांमामुळे काही राशीच्या लोकांना गुरु अस्ताचा फायदा होईल, तर काही राशीच्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यायला लागू शकते. दरम्यान, मेष, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो. गुरु ग्रहाला ज्ञान, शिक्षण, वैवाहिक आनंद, संपत्ती आणि करिअरचा ग्रह मानला जातो. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
गुरुच्या अस्तामुळे मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये फायदा होऊ शकतो. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना लाभ होऊ शकतो. तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये नवीन सुरुवात करु शकता. गुरु ग्रहाच्या या संक्रमणामुळे तुम्हाला सर्व क्षेत्रामध्ये फायदा होईल. व्यावसायिकांना कामानिमित्त प्रवेश करु शकतात. एखाद्या नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी परिवाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
मिथुन राशीतून गुरुच्या अस्त होण्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी हा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच परिवारामध्ये कोणालाही कोणतेही जुने आजार असतील तर ते बरे होतील. कामाच्या ठिकाणी सर्तकता बाळगावी लागेल. कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. गुरु अस्ताच्या संक्रमणामुळे जीवनामध्ये येणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतील. त्यामुळे या राशीच्या लोकांचा आत्मविश्वासही वाढेल. गुरुच्या या संक्रमणामुळे प्रत्येक क्षेत्रातील लोकांना कामामध्ये यश संपादन करतील. तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस चांगला राहील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा उत्तम राहील.
गुरुच्या अस्तामुळे कुंभ राशीच्या लोकांना अनेक फायदे होतील. तुमच्या भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. एखादे जुने आजार असतील तर ते दूर होतील. कुटुंबात कोणत्याही समस्या असतील तर त्या दूर होतील. गुरुच्या संक्रमणामुळे आर्थिक समस्येतून सुटका होऊ शकते. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे यश मिळेल. आर्थिक दृष्ट्या तुम्हाला अधिक लाभ होऊ शकतो. तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवात उत्साहाने करु शकता. आरोग्य उत्तम राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)