फोटो सौजन्य- istock
अंकशास्त्रानुसार 9 क्रमांकाचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे चंद्राची संख्या 2 मानली जाते. त्याचप्रमाणे आज मूलांक 2 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होऊ शकतो. तर मूलांक 9 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी सकारात्मक विचाराने पावले उचलावे लागतील. या लोकांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. या लोकांना व्यवसायासाठी आजचा दिवस उत्तम राहील. त्यासोबत तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर आजचा दिवस उत्तम असेल. यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. पैशाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील. या मूलांकांच्या लोकांना पैसे कमाविण्याच्या संधी उपलब्ध होतील.
मूलांक 2 असलेल्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. मानसिक ताणतणावातून आराम मिळेल. या मूलांकांची लोक आज कुटुंबासोबत वेळ घालवतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.
मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक दृष्टीने आजचा दिवस अनुकूल राहील. व्यवसायात आर्थिक लाभ होऊन तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करता येऊ शकतो.
मूलांक 4 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. आज वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्याल. कुटुंबाच्या दृष्टीने आजचा दिवस उत्तम राहील.
मूलांक 5 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. आज या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात नफा होईल. यामुळे तुम्हाला व्यवसायामध्ये सकारात्मक परिणाम जाणवतील. आर्थिक दृष्ट्या विचार केल्यास आजचा दिवस अनुकूल राहील. आरोग्याची काळजी घ्या.
मूलांक 6 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायामध्ये पैसे गुंतवण्याची योजना बनवू शकता. परंतु कोणतेही निर्णय घेताना काळजी घेण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. कामामध्ये सकारात्मक विचार करा. कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता जास्त आहे. पैशाच्या दृष्टीने तुमचा दिवस सामान्य राहील.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य असेल. आज तुमचा मानसिक ताण वाढू शकतो या गोष्टीचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. तुम्हाला दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असल्यास सावधगिरी बाळगा. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणतेही महत्त्वाचे काम करताना घाई करु नका अन्यथा नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. व्यवसायात तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)