फोटो सौजन्य- istock
जून महिन्याचा दुसरा आठवडा म्हणजे ९ जून ते १५ जूनचा आठवडा ग्रहाच्या संक्रमणासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. या आठवड्यांमध्ये वटपौर्णिमा, संकष्टी चतुर्थी हे व्रत येत आहे. यामुळे हा आठवडा विशेष असणार आहे. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी जूनचा दुसरा आठवडा कसा असेल, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संघर्षाचा असू शकतो. तुमचे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात. पेशांसंदर्भात निर्णय हुशारीने घ्या, कारण खर्च अचानक वाढू शकतो आणि बजेट बिघडू शकते. तसेच पोट आणि इतर आरोग्याच्या संबंधित समस्या पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे म्हणून तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. त्याचप्रमाणे तुमच्यातील संवादाच्या अभावामुळे तुमच्या जोडीदाराशी किंवा प्रियकराशी वाद होण्याची शक्यता. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.
वृषभ राशीच्या लोकांना जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करिअर आणि व्यवसायाची सुरुवात करताना अपेक्षेपेक्षा कमी लाभ होतील. नियोजित काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी आळस सोडून कठोर मेहनत घेणे आवश्यक असेल. व्यवसायात फायदा होईल परंतु खर्च वाढतील. तणावामुळे झोप न होणे, डोक दुखणे यासारख्या समस्या होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा समिश्र राहील. पोटाची समस्या उद्भवू शकते त्यामुळे खाण्यापिण्या कडे विशेष लक्ष द्या. नोकरी करणाऱ्या लोकांना काही समस्येचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही वादात अडकणे टाळा. कोणावरही टीका करणे टाळा.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. या राशीच्या लोकांचा आठवड्याच्या सुरुवातीला जमीन, इमारत किंवा वाहनावर मोठा खर्च होऊ शकतो. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या
सिंह राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात प्रगती होईल. मालमत्तेच्या संबंधित समस्या येऊ शकते. पण जवळच्या लोकांची साथ लाभेल. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील आणि कामामध्ये नवीन योजना तयार कराल. कोणताही मोठा निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आव्हानात्मक असेल. आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात. या आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. व्यवसाय करणार्यांना फायदा होईल मात्र कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित राहणार आहे. उत्पन्नाचे साधन वाढेल. नोकरी करणाऱ्यांनी भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नये. तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होऊ शकतो.वाहन चालवताना काळजी घ्या अपघात होण्याची शक्यता.
धनु राशीच्या लोकांचा हा आठवडा तणावपूर्ण राहील. करिअर आणि व्यवसायात लाभ होईल. कामाच्या ठिकाणी अनेक समस्या येतील ज्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल.
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खास असणार आहे. अधिकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर राहील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला पैशाची संबंधित समस्या सुटतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
मीन राशीच्या लोकांसाठी मागच्या आठवड्यापेक्षा हा आठवडा चांगला राहील. अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील. जुन्या कर्जातून सुटका होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)