फोटो सौजन्य- pinterest
आज गुरुवार 24 जुलैचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी चांगला राहील तर काही लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागेल. या दिवशी चंद्र कर्क राशीमध्ये आपले संक्रमण करणार आहे. तर चंद्र बुध आणि सूर्य यांच्यामध्ये संयोग करणार आहे त्यामुळे त्रिग्रही योगा तयार होईल. तसेच पुष्य नक्षत्रामध्ये गुरुपुष्प योग आणि सिद्ध योग तयार होणार आहे. आजचा दिवस गुरुवारचा असल्याने भगवान विष्णूचे कन्या राशी सह या राशींच्या लोकांवर विशेष कृपा राहणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
मेष राशींच्या लोकांसाठी आजचा गुरुवारचा दिवस फायदेशीर राहील. या लोकांना आज कोणत्याही कामांमध्ये कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आज तुम्ही वाहन खरेदी करू शकता. वैवाहिक जीवन चांगले राहील. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुमच्या आईकडून पाठिंबा मिळेल.
कर्क राशींच्या लोकांचा आजचा गुरुवारचा दिवस उत्साहाचा राहील. या लोकांना जीवनामध्ये बदल होताना दिसून येतील. तुमची प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुमचा समाजामधील आदर वाढलेला राहील. जोडीदारासोबत तुमचे नाते चांगले राहील.
कन्या राशींच्या लोकांचा आजचा गुरुवारचा दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना अपेक्षित यश मिळू शकते. आज तुम्हाला कुठूनही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा गुरुवारचा आज खूप खास असणार आहे. आज तुम्ही ज्या योजनांचा विचार केला तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. सरकारी कामात येणारे अडथळे दूर होतील. सामाजिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना मानसन्मान मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील तसेच नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल.
वृश्चिक राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायामध्ये तुम्ही ज्या योजना जी आखली असेल त्यात तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. धार्मिक कार्यामध्ये तुम्हाला आवड निर्माण होईल. जोडीदाराची साथ लाभेल. तुम्ही व्यवसायानिमित्त बाहेरगावी जाऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)