फोटो सौजन्य- istock
24 जुलै गुरूवारचा दिवस. अजचा स्वामी ग्रह गुरू असल्याने त्याचा प्रभाव सर्व मूलांकांच्या लोकांवर राहील. गुरुचा प्रभाव सर्व मूलांकांच्या लोकांवर असलेला दिसून येईल. व्यवसायामध्ये अपेक्षेनुसार लाभ होईल. मूलांक 6 असणाऱ्यांचा आजचा पूर्ण दिवस चांगला राहील. कुटुंबासोबत वेळ चालवतील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्यांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. स्वतः वर विश्वास ठेवा तुमचे काम सोपे होईल.
मूलांक 2 असणाऱ्यांचा आजचा दिवस संमिश्र राहील. जर तुम्ही नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर त्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. नोकरी करणाऱ्या लोकांची जबाबदारी वाढेल.
मूलांक 3 असलेल्यांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. कोणत्याही कठीण परिस्थितीला तुम्ही तोंड द्यावं.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. व्यवसाय करणाऱ्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 5 असणाऱ्याचा आजचा दिवस सामान्य राहील. विचारपूर्वक निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी जर कोणी तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथे दुर्लक्ष करा.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला असेल. हे लोक कुटुंबासोबत आपला वेळ घालवतील. नोकरी करणाऱ्यांना सहकार्यांचा पाठिंबा मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे अपेक्षित यश मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसाय करणारे नवीन योजना आखू शकतात. तुम्हाला अनेक प्रगतीच्या संधी मिळतील. तुमच्या कुटुंबाच्या पाठिंब्याने तुम्ही काही धाडसी निर्णय घेऊ शकाल.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. या लोकांचा आजचा पूर्ण दिवस चांगला जाईल. तुम्ही आज एखाद्या गोष्टीची खरेदी करू शकता किंवा फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. जोडीदारासोबत वेळ घालवाल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल आणि घराचे वातावरण आनंददायी राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)