MANDIR (फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)
यंदाच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये 12 एप्रिल रोजी संपूर्ण देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. दरम्यान देशभरात हनुमानाची अनेक भव्य आणि सुंदर अशी मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आज आपण पाकिस्तानच्या कराचीमध्ये असलेल्या एका प्रसिद्ध हनुमान मंदिराविषयी जाणून घेणार आहोत.
तब्बल दीड हजार वर्ष जुने असलेले हे मंदिर पाकिस्तान मधील कराची येथे स्थित आहे. या मंदिरातील हनुमानाची मूर्ती ही त्रेता युगातली असल्याचे म्हटले जाते.
कामदा एकादशीच्या दिवशी तयार होत आहे अनेक शुभ योग, पूजेच्या वेळी अवश्य वाचा कथा
यावर्षी 12 एप्रिलला हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. निमित्ताने देशभरात हनुमान मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारतामध्ये अनेक मंदिर आहेतच पण आज आपण पाकिस्तानमधील या प्रसिद्ध हनुमान मंदिराविषयी जाणून घेऊयात.
पाकिस्तान मधील कराची मध्ये स्थित असलेले या ऐतिहासिक हिंदू मंदिराचे नाव पंचमुखी हनुमान मंदिर असे आहे. हे मंदिर सिंध सांस्कृतिक संरक्षण अधिनियम 1994 अंतर्गत राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित केले गेले आहे.
कराची मध्ये स्थित असलेले पंचमुखी हनुमान मंदिर हे दीड हजार वर्ष जुने आहे. मंदिर हिंदूंसाठी एक महत्त्वाचे मंदिर समजले जाते. कारण जगातील हे एकमेव मंदिर असे आहे ज्या ठिकाणी हनुमानाची मूर्ती ही मानवनिर्मित नसून स्वयंभू आहे. मूर्तीची उंची आठ फूट इतकी आहे. मूर्ती त्रेता युगातली असल्याचे दिले जाते.
हनुमानाने एका भक्ताला या ठिकाणी दर्शन दिले होते त्या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आल्याचे म्हटले जाते. 14 वर्षांच्या वनवासामध्ये भगवान श्रीरामांनी देखील या ठिकाणी भेट दिल्याचे म्हटले जाते. जगभरातील अनेक हिंदू मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात.
पंचमुखी हनुमान मंदिराच्या चारही बाजूला 11 परिक्रमा केल्यामुळे त्यांच्या समस्या दूर दूर होतात व इच्छा पूर्ण होतात अशी भक्तांची धारण आहे. पहाटे पाच वाजल्यापासून या मंदिरात दर्शन सुरू होते. हनुमान जयंतीनिमित्त या मंदिरात विशेष पूजेचे देखील आयोजन केले जाते.