
फोटो सौजन्य- chatgpt
गुजरातमधील गिरनार पर्वत हे जैन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असं तीर्थक्षेत्र मानलं जातं. गिरनारला प्राचीन काळी ‘उर्ज्जयंत’, ‘रैवतक’, रेवतगिरी अशा नावांनी ओळखलं जातं होतं. या पर्वताचा उल्लेख प्राचीन साहित्य आणि शिलालेखांमध्ये सुद्धा आढळतो. मराठी विश्वकोशानुसार गिरनारचा उल्लेख हा अशोकपूर्व काळापासून आढळतो आणि इथे इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातील अशोक कालीन शिलालेख सुद्धा आहे.
जैन धर्मातील ऋषभदेव हे पहिले तीर्थंकार मानले जातात. जैन परंपरेनुसार त्याने मानवाला विविध जीवनउपयोगी कला आणि व्यवसायाचं ज्ञान दिलं आणि त्यानंतर संसाराचा त्याग करून अध्यात्मिक मार्ग स्वीकारला. त्यामुळे जैन धर्माच्या इतिहासात ऋषभदेवांना अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे.
त्याचं मंदिर गिरनार पर्वताच्या मुख्य पहिल्या टप्प्यावर मुख्य जैन मंदिरासमोरच स्थित आहे. येथे पोहोचण्यासाठी पायथ्यापासून साधारण 3800 ते 4000 पायऱ्या चढाव्या लागतात. गिरनारचा ऋषभदेवांशी संबंध प्राचीन जैन परंपरेतच सांगितला जातो. मात्र गिरनारवरील प्रमुख आणि सर्वाधिक प्रसिद्ध जैन तीर्थ भगवान नैनिनाथ म्हणजेच 22 वे तीर्थंकर यांच्या दीक्षा, केवलज्ञान आणि निर्माणाशी जोडलेले आहे त्यामुळे गिरनारवरील ऋषभदेवांचा उल्लेख करताना त्यांचा संबंध संपूर्ण गिरनारच्या जैन परंपरेशी जोडून पाहणं योग्य ठरतं.
गिरनार पर्वतावरती अनेक प्राचीन जैन मंदिर आणि तीर्थस्थळ आहे. यामध्ये भगवान नेमिनाथाचं मंदिर हे विशेष प्रसिद्ध आहे. गिरनारच्या विविध टोकांमध्ये जैन तीर्थंकर आणि साधुंच्या चरण पादुका, मंदिर आणि इतर धार्मिक स्थळ आहे. अंबिका देवीचं मंदिर, राजुलची गुहा, नेमिनाथाचं मंदिर यांसारखी स्थळ ही तीर्थक्षेत्रांच्या धार्मिक परंपरेचा भाग आहे. येथील मंदिराचा कोरीव काम राजस्थानच्या प्रसिद्ध अशा दिलवाडा मंदिराशी मिळतं जुळत आहे, असं सांगितलं जातं. या पर्वतावरती एकूण पाच मुख्य टप्पे आहे. पहिल्याच टप्प्यावरती भगवान ऋषभदेव मंदिराव्यतिरिक्त दिगंबर जैन मंदिर, राजूलमती गुहा आणि बाहुबलीची मूर्ती देखील पाहायला मिळते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)