फोटो सौजन्य- gemini.
गुजरातमधील जुनागड जवळील गिरनार पर्वत हा जैन धर्मातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानला जातो. या पर्वतावरती अनेक जैन मंदिर सुद्धा आहे. त्यापैकी भगवान लैलिनाथ यांना समर्पित असलेले मल्लिनाथ मंदिर विशेष महत्त्वाचे आहे. मल्लिनाथ हे जैन धर्मातील एकूण 19 वे तीर्थंकार मानले जातात. जैन परंपरेनुसार, मल्लिनाथ हे वर्तमान अवसर्पिणी काळातील 19 वे तीर्थकार आहे त्यांचे प्रतीक कलश मानलं जातं त्यांच्या जन्माबाबत जैन ग्रंथांमध्ये मिथिला नगरीचा उल्लेख आढळतो.
मल्लिनाथांचा जीवनकथेत वैराग्य, आत्मसंयम, तपस्या आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग याला विशेष महत्त्व आहे. जैन धर्माच्या तत्वज्ञानानुसार तीर्थकर हे जीवांना मोक्षाच्या मुक्तीकडे नेणारे आध्यात्मिक मार्गदर्शक मानले जातात. गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास मध्ययुगीन गुजरातच्या जैन स्थापत्य परंपरेशी जोडलेला आहे. उपल्बध ऐतिहासिक माहितीनुसार, वास्तुपाल आणि तेजपाल या प्रसिद्ध जैन मंत्रांनी 13 व्या शतकात मल्लिनाथांना समर्पित असलेलं असं त्रिशाही मंदिर उभारलं.
काही दाखल्यानुसार, त्याची तारीख इ.स. 1231 ते 1232 अशी देतात. तर गुजरात पर्यटनाच्या माहितीत मंदिराची उभारणी इ.स. 1177 मध्ये झाली आहे असे नमुद करण्यात आली आहे. तर मंदिराच्या बांधकाम आणि वर्षाबाबत माहितीमध्ये फरक दिसून येतो. मात्र ते मध्ययुगीन काळातील जैन मंदिर आहे याबाबत व्यापक अशी संमती आहे.
वास्तुपाल आणि तेजपाल हे गुजरामधील जैन स्थापत्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी गुजरात आणि राजस्थानमध्ये अनेक जैन मंदिराच्या उभारणीला हातभार लावला. मल्लिनाथ मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची त्रिकुट रचना. म्हणजे तीनगर्भगृहाचा मंदिर समूह. त्यामुळे हे गिरनारमधील इतर काही जैन धर्माच्या स्थापत्यशैलीपेक्षा वेगळं दिसतं. मंदिरांच्या रचनेत गुजरातमधील विकसित झालेले मारू, गुर्जर किंवा सोलंकी स्थापत्यशैलीचे प्रभाव दिसतात.
मंदिरातील दगडी कोरीव काम, स्तंभ आणि धार्मिक प्रतिमा या जैन स्थापत्यशैलीची वैशिष्ट्य दाखवतात. मल्लिनाथ मंदिराचं महत्त्व समजून घेण्यासाठी गिरनारचे धार्मिक स्थान समजणं गरजेचं आहे. गिरनारला प्राचीन काळी रेवतकाळी किंवा रेवत पर्वत नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ आढळतात. जैन परंपरेत हा पर्वत 22 वे तीर्थकर भगवान नेमिनाथ यांच्याशी जोडलेला आहे. नेमिनाथाने गिरनार येथे तपश्चर्या करून मोक्ष प्राप्त केला. मल्लिनाथांचा उद्देशाचा केंद्रबिंदू म्हणजे आत्मशुद्धी, संयम, अहिंसा आणि संसाराच्या मोहातून मुक्त होण्याचा मार्ग.
जैन धर्मात तीर्थकारांची पूजा त्यांची सांसारिक इच्छा पूर्ण करून देणाऱ्या देवतेच्या रुपात करण्यापेक्षा त्याचे वैराग्य, ज्ञान आणि मोक्ष मार्गाचं आदर्शाचं स्मरण करण्यासाठी केली जाते. गिरनारचं जैन मंदिर समूह हा एकाच काळात बांधलेला एकच समूह नाही तर या काळात मंदिर, उपमंदिरे आणि जीर्णीद्धाराची कामं होत गेली.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






