
फोटो सौजन्य - Social Media
त्रिमूर्ती (ब्रह्म , विष्णू आणि महेश) तिघे पृथ्वीवर आले. त्यांनी आधी अनसूयेला काही कच्चे धान्य दिले आणि त्या धान्याला शिजवायला सांगितले आणि म्हंटले की या अन्नाचा आम्ही भिक्षा म्हणून तेव्हाच स्वीकार करू जेव्हा अन्न आगीच्या साहाय्याने शिजवले गेले नसेल. मग अनसूया सूर्याची आराधना करून ते अन्न शिजवून घेते आणि त्रिमूर्तींना वाढते पण त्रिमूर्ती ते अन्न स्वीकारत नाहीत ते म्हणतात की आम्ही ही अन्न रुपी भिक्षा तेव्हाच स्वीकारू जेव्हा ते तू आम्हाला निर्वस्त्र होऊन देशील.
हे ऐकून अनसूयेच्या पायाखालची जमीन सरकते. ती विचार करते की हे तिच्या धर्माच्या विरूद्ध आहे. परपुरषासमोर असे जाणे म्हणजे तिच्या पतिव्रता म्हणून असलेल्या किर्तीला संपवून टाकणे. त्यामुळे अनसूया त्रिमूर्तींना आपल्या पतिव्रतेच्या तेजाने लहान बाळांमध्ये रूपांतरित करते आणि आपले काय पूर्ण करते. स्वर्गात त्रिमूर्तींच्या पत्नींना मनात भीती वाटू लागते की इतका वेळ झाला पती परतले का नाही? ते स्वतः पृथ्वीतलावर येतात. पतींना बाळरूपात पाहून त्यांच्या मनात भीती वाढते. ते अनसूयेची माफी मागतात.
तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला वरदानरुपी तीन पुत्र देतात. बाळरूपी जन्मलेले ब्रह्म चंद्र या नावाने ओळखले जातात तर विष्णू, ब्रह्म आणि शंकर तिघांनी एकच बाळरूपी जन्म घेतला ते म्हणजे दत्तात्रय! तर बाळरूपी जन्मलेले शंकर म्हणजे दुर्वासा ऋषी!