Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyotiba Story: जोतिबाच्या श्रावणयष्टी यात्रेचे काय आहे धार्मिक महत्त्व? जाणून घ्या

महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळील वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. चैत्र यात्रेप्रमाणेच श्रावणयष्टी यात्रा देखील जोतिबा भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. श्रावणयष्टी यात्रेचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 21, 2026 | 09:44 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • जोतिबाच्या श्रावणयष्टी यात्रेचे काय आहे धार्मिक महत्त्व
  • श्रावणयष्टी यात्रा म्हणजे काय
  • या यात्रेचे काय आहे वैशिष्ट्ये
 

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा हे राज्यातील प्रमुख देवस्थानांपैकी एक आहे. वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते, मात्र श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी, म्हणजेच श्रावणषष्ठी, हा दिवस विशेष पवित्र मानला जातो. या दिवशी जोतिबा गडावर भव्य यात्रा भरते. भर पावसातही लाखो भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी गडावर येतात. भक्तिभाव, पारंपरिक विधी आणि लोकसंस्कृती यांचा संगम असलेली ही यात्रा महाराष्ट्राच्या धार्मिक परंपरेतील एक महत्त्वाचा उत्सव मानली जाते. जोतिबाच्या श्रावणयष्टी यात्रेचे काय आहे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

श्रावण शुक्ल षष्ठीला जोतिबा गडावर यात्रा

दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात षष्ठी तिथीला श्रावणषष्ठी यात्रा भरते. महाराष्ट्रातील अनेक जोतिबा, खंडोबा, भैरवनाथ आणि ग्रामदैवतांच्या मंदिरामध्ये या दिवशी विशेष उत्सव आणि यात्रा पाहायला मिळते.

Jyotiba Story: जोतिबा मंदिरातील उतरंड परंपरा नेमकी काय आहे, जाणून घ्या

पौराणित कथा

पौराणिक कथेनुसार श्रावण शुद्ध षष्ठीला चर्पटअंबेने रत्नासुराचा वध केला. त्याचवेळी राक्षसाच्या रक्ताने देवीच्या अंगांचा दाह झाला तो शांत करण्यासाठी केदारनाथांसह सर्व देवांनी लिंबू, दुर्वा, बेल आणि वाळ्याने खास पूजा केली. तेव्हापासून आजतागायत श्रावण शुक्ल षष्ठी तिथीला रात्रभर जागरण करून देवीची लिंबू, बेल आणि फुलांची विशेष पूजा बांधण्यात येते.

Jyotiba story: ज्योतिबाला मीठ पीठ का वाहतात? ते अर्पण करण्याची काय आहे परंपरा, जाणून घ्या

श्रावणयष्टी यात्रेचे वैशिष्ट्ये

या यात्रेचं वैशिष्ट्य असं की भर पावसातही लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. या यात्रेत फक्त धुपारती सोहळा निघतो. ही यात्रा रात्रभर असते. मंदिरात रात्रभर देवीचा जागर केला जातो. पहाटे धुपारती सोहळा निघून अंगारा वाटप झाल्यानंतर या यात्रेची सांगता होते. श्रावण महिना हा भगवान शिवाला अत्यंत प्रिय मानला जातो. षष्ठी तिथी ही शक्ती, संरक्षण आणि कल्याणाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी देवस्थानामध्ये अभिषेक, पूजा, कीर्तन भजन आणि पालखी सोहळे आयोजित केले जातात. भाविक नवस फेडण्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी देखील दर्शन घेतात. ही यात्रा ग्रामीण संस्कृती आणि लोकपंरपरेच दर्शन घडवते. भाविक पायी दिंडी काढून खास देवदर्शनासाठी येताता. कुटुंबाच्या कल्याणासाठी नवस आणि ओटी भरण्याची प्रथा देखील अनेक ठिकाणी आहे. काही ठिकाणी स्थानिक बाजार, खेळणी, मिठाई आणि पारंपरिक वस्तूची दुकानं या यात्रेच आकर्षण ठरतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: श्रावणयष्ठी यात्रा म्हणजे काय?

    Ans: श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला श्री क्षेत्र जोतिबा येथे भरणाऱ्या धार्मिक उत्सवाला श्रावणयष्ठी यात्रा असे म्हणतात. या दिवशी हजारो भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी गडावर येतात.

  • Que: जोतिबाच्या श्रावणयष्ठी यात्रेला इतके महत्त्व का आहे?

    Ans: पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी चर्पटअंबेने रत्नासुराचा वध केला होता. त्या घटनेच्या स्मरणार्थ ही यात्रा साजरी केली जाते आणि विशेष पूजा-अर्चा केली जाते.

  • Que: श्रावणयष्ठी यात्रेच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे विशेष महत्त्व असते?

    Ans: या दिवशी लिंबू, बेलपत्र, दुर्वा अर्पण करणे, धुपारतीत सहभागी होणे, रात्रभर जागरण करणे, जोतिबाचे दर्शन घेणे आणि भक्तिभावाने प्रार्थना करणे विशेष शुभ मानले जाते.

Web Title: Jyotiba story what is the religious significance of jyotiba sravanayashti yatra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Religion

संबंधित बातम्या

Trigrahi Yoga: त्रिग्रही योगाचा 22 जूनपासून होणार परिणाम; या राशींना सामोरे जावे लागेल आव्हानांना, जाणून घ्या उपाय
1

Trigrahi Yoga: त्रिग्रही योगाचा 22 जूनपासून होणार परिणाम; या राशींना सामोरे जावे लागेल आव्हानांना, जाणून घ्या उपाय

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Mangal Gochar 2026: 21 जूनला मंगळाचे महागोचर; जाणून घ्या कोणत्या राशींवर होणार शुभ-अशुभ परिणाम
3

Mangal Gochar 2026: 21 जूनला मंगळाचे महागोचर; जाणून घ्या कोणत्या राशींवर होणार शुभ-अशुभ परिणाम

Brahmavaivarta Purana: ब्रह्मवैवर्त पुराणात श्रीकृष्णांना परब्रह्म का मानले आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
4

Brahmavaivarta Purana: ब्रह्मवैवर्त पुराणात श्रीकृष्णांना परब्रह्म का मानले आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.