Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gautam Buddha : तुम्हाला बुद्धांचा तांदूळ माहितेय का ? शांतीचा संदेश देणाऱ्या तथागतांचं शेतीशी होतं खास नातं

प्राणी असो की कोणती व्यक्ती अडलेल्या मदत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, हीच शिकवण बुद्धांनी दिली. पण या व्यतिरिक्तचे बुद्ध तुम्हाला माहितेय का ?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 15, 2026 | 01:01 PM
Gautam Buddha : तुम्हाला बुद्धांचा तांदूळ माहितेय का ? शांतीचा संदेश देणाऱ्या तथागतांचं शेतीशी होतं खास नातं
Follow Us
Close
Follow Us:
  • तुम्हाला बुद्धांचा तांदूळ माहितेय का ?
  • शांतीचा संदेश देणाऱ्या तथागतांचं शेतीशी होतं खास नातं
गौतम बुद्धांनी मानवी जीवनाचं सार सांगितलं पण ते ही विज्ञानाला जोडून. बुद्ध तपस्वी होते त्याचबरोबर त्यांच्याकडे होती करुणा. प्राणी असो की कोणती व्यक्ती अडलेल्या मदत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, हीच शिकवण बुद्धांनी दिली. पण या व्यतिरिक्तचे बुद्ध तुम्हाला माहितेय का ? तर गोष्ट अशी की, प्राचीन काळी कपिलवस्तूमध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय होता. त्यावेळी तांदळाच्या अनेक जाती पिकवल्या जात, पण काही ठिकाणी जमीन सुपीक असूनही योग्य पिक येत नव्हते. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते.एकदा बुद्ध आपल्या भिक्षूंंसह त्या भागातून जात होते.

तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांची अडचण ऐकून घेतली. बुद्धांनी शेतकऱ्यांना काही विशेष तांदळाचे बीज दिले आणि सांगितले की योग्य ती मेहनत आणि हवामानाचा सखोल अभ्यास करुन हे बीज मातीत पेरा आणि या तांदळाची लागवड करा. शेतकऱ्यांनी बुद्धांच्या सांगण्याप्रमाणे त्या बियांची पेरणी केली. काही महिन्यांनी जेव्हा पीक आले, तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्या तांदळाला विशेष सुगंध आणि चव होती. दाणे थोडे काळसर रंगाचे असल्यामुळे त्याला पुढे “कालानमक तांदूळ” असे नाव पडले. कालांतराने हा तांदूळ कपिलवस्तूची ओळख बनला. आजही उत्तर प्रदेश आणि नेपाळ सीमेवरील भागात कालानमक तांदूळ प्रसिद्ध मानला जातो. त्यामुळे अनेक लोक या तांदळाला “बुद्धांचा तांदूळ” असेही म्हणतात. त्यावेळी बुद्धांना शेती आणि हवामाचा सखोल अभ्यास देखील होता. हा तांदूळ सध्या दुर्मिळ होत असला तरी एकेकाळी लयाला जाणाऱ्या शेतीला वाचवण्यासाठी बुद्धांनी दिलेली देण म्हणजे हा कालानमक तांदूळ. या तांदळाचे फायदे म्हणजे याचा भात आरोग्यदायी मानला जातो.

 

गौतम बुद्धांचे केस खरंच कुरळे होते का ? | Navarashtra

कालानमक तांदळाचे फायदे 

कालानमक तांदूळ इतर तांदळांच्या जातीच्या तुलनेत पचायला हलका असतो. त्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि पचनसंस्थेची समस्या असलेल्या लोकांसाठी हा चांगला पर्याय मानला जातो.काही अभ्यासांनुसार या तांदळात चरबी कमी असल्यामुळे तो हृदयाच्या आरोग्यासाठी तुलनेने चांगला पर्याय आहे. डायबिटीसच्या लोकांना भात खाऊ नये म्हणून सांगतात पण हा तांदूळ डायबिटीसच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर मानला जातो. कालानमक तांदूळ हा भारतातील अत्यंत सुगंधी आणि पारंपरिक तांदळाचा प्रकार मानला जातो.शिजवल्यानंतर भात मऊ आणि हलका होतो.यात लोह, झिंक आणि इतर खनिजे चांगल्या प्रमाणात असतात.पचनास हलका असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.कालानमक तांदूळ पौष्टिक असल्यामुळे शरीराला ऊर्जा देतो. यात असलेले खनिज घटक शरीराला पोषक घटक देतात.

जगातील सर्वात मोठे बौद्ध मठ कोणते – Navarashtra

Web Title: Kalanamak rice and gautam buddha story in kapilvastu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 01:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.