फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये एकादशीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. एकादशीचा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. यावेळी कामिका एकादशीचे व्रत सोमवार, 21 जुलै रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी दानधर्म करण्यालाही विशेष महत्त्व आहे.
जी व्यक्ती कामिका एकादशीचे व्रत करते ते भक्तांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. असे म्हटले जाते की, हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्तता होते. या दिवशी सर्व राशीच्या लोकांनी कोणते उपाय करावे ते जाणून घेऊया.
मेष राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी मसूर, तांब्याची भांडी, लाल वस्त्र दान करणे चांगले मानले जाते.
वृषभ राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी दूध, दही, पांढरे कपडे आणि साखरेचे दान करावे. असे केल्याने मानसिक शांती मिळते.
मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळवायचे असल्यास एकादशीच्या दिवशी हिरवे कपडे, मूग डाळ या गोष्टींचे दान करावे.
कर्क राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी तांदूळ, चांदी, पांढरे कपडे दान करावेत. या गोष्टींचे दान केल्याने घरामध्ये सुख शांती राहते आणि मानसिक संतुलनही व्यवस्थित राहते.
सिंह राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी गूळ, गहू आणि तांब्याच्या वस्तूंचे दान करावे.
कन्या राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी मूग डाळ, हिरवी फळे, पेन या गोष्टींचे दान करावे. असे केल्यास तुम्हाला जीवनामध्ये बुद्धिमत्ता, करिअर आणि परीक्षेत अपेक्षित यश मिळेल.
तूळ राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी अत्तर, पांढरे चंदन, दूध दान करावे. असे केल्याने वैवाहिक जीवनात आनंद राहील.
वृश्चिक राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी काळे तीळ, लाल रंगांचे वस्त्र दान करावे. यामुळे रागावर नियंत्रण ठेवता येते.
धनु राशीच्या लोकांचा एकादशीचा दिवस खूप खास असणार आहे. या दिवशी हळद, कोणतीही पिवळ्या रंगांची डाळ दान करावे.
मकर राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी ब्लँकेट, तीळ आणि तूप यांचे दान करावे. अशा वस्तूंचे दान केल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो.
कुंभ राशीच्या लोकांनी कामिका एकादशीच्या दिवशी निळे कपडे, तेल यांचे दान करावे.
मीन राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी तांदूळ, साखर मिठाई, पिवळी फुले इत्यादी गोष्टींचे दान करावे
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)