फोटो सौजन्य- pinterest
धर्मामध्ये काही वनस्पतींना महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. यामध्ये तुळशी, बेलपत्र, केळी, पिंपळ आणि शमी इत्यादी वनस्पती यांचा समावेश होतो. त्यासोबतच शनि ग्रहाचा संबंध पिंपळ आणि शमी वनस्पतीशी असल्याचे मानले जाते. मान्यतेनुसार या दोन्ही वनस्पती शनि देवाच्या प्रभावाखाली असतात. त्यामुळे या वनस्पतीची पूजा केल्याने शनि देव प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे. पिंपळाचे झाड खूप मोठे असते त्यामुळे ते घरामध्ये लावता येत नाही मात्र शमी वनस्पती घरामध्ये लावता येते. यामुळे कुंडलीतील वास्तूदोष दूर होतोच त्याचबरोबर कुंडलीतील दोषांपासूनही मुक्तता मिळू शकते. शमी वनस्पतीची पूजा कशी केली जाते, पूजा करण्याचे काय फायदे आहेत, जाणून घ्या
असे म्हटले जाते की, शमीच्या झाडावर अनेक देव एकत्र राहतात. सर्व यज्ञांमध्ये शमीच्या झाडाच्या समिधाचा वापर अत्यंत शुभ मानला जातो. तंत्र-मंत्रातील अडथळे आणि नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी शमीच्या काट्यांचा वापर केला जातो.
शमी पंचग म्हणजेच फुले, पाने, मुळे, डहाळे आणि रस यांचा वापर करून शनि ग्रहाशी संबंधित समस्यांपासून लवकर आराम मिळू शकतो. वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे शमीच्या झाडाची नियमितपणे पूजा केली जाते. त्यासोबतच शमीच्या वनस्पती समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो त्यामुळे शनि दोषाच्या दुष्परिणामांपासून संरक्षण मिळते, अशी मान्यता आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, कवी कालिदास यांनी शमीच्या झाडाखाली ध्यान करून ज्ञान प्राप्त केले. नवरात्रीत विजयादशमीच्या दिवशी शमीची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते.
ज्योतिषशास्त्रानुसार, शमी वनस्पती नकारात्मक प्रभाव दूर करते. शमी वनस्पतीमुळे काळ्या जादूमुळे होणारा अडथळा देखील दूर करते.
शमी वनस्पतीच्या मुळाला काळा धागा बांधा आणि तो तुमच्या गळ्यात किंवा हातात परिधान करा. असे केल्याने शनि देवाशी संबंधित जीवनातील सर्व समस्या लवकरच दूर होण्यास मदत होते.
शमी वनस्पती गणपती बाप्पाची आवडती वनस्पती मानली जाते आणि त्याची पाने देखील भगवान गणेशाच्या पूजेमध्ये अर्पण केली जातात. ते जवळजवळ प्रत्येक घराच्या दाराच्या उजव्या बाजूला लावलेले दिसते. कोणतेही काम करण्यापूर्वी ते लावणे शुभ मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)