Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kamika Ekadashi: यंदा कामिका एकादशीचे व्रत कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, योग आणि महत्त्व

जुलै महिन्यामध्ये कामिका एकादशीचे व्रत पाळले जाते. या व्रताला विशेष महत्त्व आहे. यावेळी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. जाणून घ्या कामिका एकादशीचे व्रत कधी आहे, शुभ मुहूर्त, योग आणि महत्त्व

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 12, 2025 | 09:56 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथी आणि दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यामध्ये दोन तिथी येतात. एक शुक्ल पक्षामध्ये तर दुसरी कृष्ण पक्षामध्ये. प्रत्येक तिथीला स्वतःचे असे विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु वर्षामध्ये येणाऱ्या 24 एकादशींपैकी कामिका एकादशीला विशेष महत्त्व आहे. कारण ही तिथी श्रावण महिन्यातल्या कृष्ण पक्षात येते.

या तिथीच्या दिवशी भक्तांनी अगदी मनोभावे पूजा करुन उपवास केल्यास भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. यावेळी कामिका एकादशीच्या दिवशी विशेष योग देखील तयार होत आहे. गुरु पुष्य योग, सर्वार्थ सिद्धि योग आणि अमृत सिद्धि योग तयार होत आहे. त्यामुळे या दिवसाला आणखी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदा कामिका एकादशी कधी आहे, शुभ मुहूर्त, योग आणि महत्त्व जाणून घ्या

कधी आहे कामिका एकादशी

पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात रविवार, 20 जुलै रोजी सुरु होत आहे. एकादशी तिथीची सुरुवात रविवार, 20 जुलै रोजी दुपारी 12.12 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती सोमवार, 21 जुलै रोजी सकाळी 9.38 वाजता होईल. उद्यतिथीनुसार कामिका एकादशीचे व्रत सोमवार, 21 जुलै रोजी पाळले जाणार आहे.

Zodiac Sign: त्रिपुष्कर योगामुळे वृषभसह या राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ, शनिदेवाची राहणार कृपा

कामिका एकादशी शुभ योग

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला वृद्धी आणि ध्रुव योग एकत्रितपणे तयार होत आहे. यासोबतच इतर अनेक योग तयार होत आहे. असे म्हटले जाते की, या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने भक्तावर धनदेवतेचा आशीर्वादाचा वर्षाव होतो. भक्तांने यावेळी आंघोळ झाल्यानंतर ध्यान करावे. तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी.

कामिका एकादशीला कशी करावी पूजा

कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करुन स्वच्छ कपडे परिधान करावे

त्यानंतर चौरंगावर कापड पसरवून भगवान विष्णूच्या मूर्तीची स्थापना करावी

नंतर पिवळी फुले, धूप, दिवा, चंदन अर्पण करावे. नंतर नैवेद्य दाखवावा.

यावेळी तुळशीच्या पानांना विशेष महत्त्व असल्याने पूजेमध्ये त्यांचाही समावेश करावा.

Numerology: शनि देवाच्या कृपेने या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल लाभ

पूजा करुन झाल्यानंतर विष्णूच्या मंत्रांचा जप आणि सहस्रनामाचे पठण करावे.

हे सर्व झाल्यानंतर आरती करुन घ्यावी आणि केशर किंवा मखनाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.

कामिका एकादशीचे महत्त्व

कामिका एकादशीचे व्रत हे भगवान विष्णू यांना समर्पित आहे. धार्मिक मान्यतेनुसार, हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. पुत्रदा एकादशीचे व्रत संतती प्राप्तीसाठी विशेष करुन पाळले जाते. तसे कामिका एकादशीचे व्रत पापांपासून मुक्ती मिळविण्यासाठी केले जाते, अशी मान्यता आहे. कामिका एकादशीच्या दिवशी तुळस, शंख आणि गंगाजलाने भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Kamika ekadashi 2025 shubh muhurt yoga importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 09:56 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
1

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा
2

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
3

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
4

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.