फोटो सौजन्य- pinterest
शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. शनिवार, 12 जुलै रोजी चंद्र दिवसरात्र शनिच्या मकर राशीमध्ये संक्रमण करणार आहे. त्यामुळे सर्व राशीच्या लोकांवर याचा प्रभाव राहील. चंद्र आणि बुध यांच्यामध्ये संसप्तक योग तयार होत आहे. तसेच सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे. त्यासोबतच कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. अशावेळी त्रिपुष्कर योग आणि शनिदेवाच्या कृपेमुळे वृषभ राशीसह काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. शनिदेवाच्या कृपेमुळे वृषभ राशीसह कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. शनिदेवाच्या आशीर्वादाने या लोकांच्या कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. तसेच या लोकांना सुख समृद्धी लाभेल. तुम्ही कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम कराल. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करण्यास मदत होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायानिमित्त लांब जावे लागेल. उच्च शिक्षण क्षेत्रातील अडचणी दूर होऊ शकतील.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील. व्यवसायामधील नियोजित काम पूर्ण होतील. कामात तु्म्हाला आमूलाग्र बदल होईल. तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांचा पाठिंबा मिळेल. जे लोक नोकरी बदलायचा विचार करत आहे अशा लोकांना यश मिळेल. नवीन संधी मिळतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही कोणत्याही जुन्या योजनेत गुंतवणूक केली असाल त्यातून तुम्हाला चांगला फायदा होईल.
तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस अपेक्षेपेक्षा जास्त चांगला राहील. तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल. तसेच तुम्हाला कामाच्या ठिकाणी कठोर मेहनत घ्यावी लागेल. रिअल इस्टेट, प्रॉपर्टी आणि ट्रान्सपोर्टमध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. आरोग्याची काळजी घ्या.
मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कोणतेही काम करताना तुम्हाला आत्मविश्वासाने करावे लागेल. तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाने लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल. कोणतेही निर्णय घेताना हुशारीने घ्या.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)