फोटो सौजन्य- istock
आज शनिवार, 12 जुलैचा दिवस सर्व मूलांकांसाठी विशेष राहील. आज काही मूलांकांच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल. आज सर्व मूलांकांच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव राहील. ज्या लोकांना कामात अडथळे येत आहेत ते दूर होतील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्यांचा दिवस संमिश्र राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस चांगला राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंब किंवा मित्रपरिवारामध्ये गैरसमज असल्यास दूर होतील.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये असलेले मतभेद दूर होतील. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावे लागेल. कला, संगीत, लेखन क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होईल.
मूलांक 3 असलेले लोक कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावे. तसेच तुम्हाला कोणतेही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील. लोक शिक्षण, अध्यापन, प्रशासन आणि बॅंकेत कार्यरत आहेत त्यांना फायदा होईल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांनां कामाच्या ठिकाणी अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायामध्ये सावधानता बाळगायला पाहिजे. कोणतेही निर्णय घेताना घाई करू नका. मालमत्ते संबंधित गोष्टींमध्ये अडथळा येऊ शकतो.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. या लोकांना बुद्धिमत्ता कामाच्या ठिकाणी लोकांना आकर्षित करेल. मीडिया, मार्केटिंग, सेल्स किंवा नेटवर्किंगशी संबंधित लोक आज काहीतरी खास करू शकतात. मानसिक थकवा जाणवू शकतो.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस व्यस्त राहील. तुमचे मन आनंदी राहील. नात्यामध्ये गोडवा राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. डिझाइन, फॅशन किंवा स्वयंपाकघराशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना लाभ होऊ शकतो.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस खास राहील. हे लोक एखाद्या विषयावर जास्त विचार करु शकतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदा होऊ शकते. सामाजिक क्षेत्रामध्ये यश मिळेल. तुमच्या कमतरतेमुळे ताण कमी होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांना जास्त मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण येऊ शकतो. तुमच्या जबाबदाऱ्या कार्यक्षमतेने पार पाडू शकाल. व्यवसायामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नात्यामध्ये असलेले मतभेद दूर होतील.
मूलांक 9 असणाऱ्यांचा आजचा दिवस उत्साहाचा असेल. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागेल. कोणताही निर्णय सुज्ञपणे घ्या. राग टाळा. कोणतेही निर्णय घेताना घाई करणे टाळा. आर्थिक नफा होण्याची शक्यता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)