फोटो सौजन्य- istock
ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायाचे प्रतीक असलेला शनिदेव. त्यांच्या कर्मानुसार फळ देणारा ग्रह म्हणून ओळखले जाते. ग्रहांच्या हालचालीनुसार शनिची स्थिती मंद असते म्हणून तो एकाच राशीमध्ये अडीच वर्ष राहतो आणि नंतर परत त्याच राशीमध्ये येण्यासाठी त्याला 30 वर्षे लागतात. सध्या शनि मीन राशीमध्ये आपले संक्रमण करत आहे. त्याची वक्री रविवार, 13 जुलै रोजी होणार आहे. शनिच्या या वक्रीचा परिणाम प्रत्येक कुंडलीतील लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो.
ज्यावेळी शनि मीन राशीमध्ये वक्री होतो त्यावेळी एक विशेष दुर्मिळ केंद्र त्रिकोण राजयोग तयार करतो. या योगाचा प्रभाव काही राशींच्या लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीने होताना दिसून येतो. या राजयोगाचा परिणाम म्हणजे अचानक आर्थिक लाभ, भाग्यवृद्धी, सन्मान इत्यादी होण्याची शक्यता असते. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनि शुभ घरात असतो अशा लोकांना त्यांचा सर्वाधिक फायदा होतो. ज्यांची कामे दीर्घकाळापासून प्रलंबित आहे अशा लोकांना त्यांचा लाभ होतो. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी, जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा कुंडलीतील केंद्रस्थानांचे स्वामी आणि त्रिकोणस्थानांचे एकमेकांशी संबंध निर्माण करतात, तेव्हा त्याला केंद्र त्रिकोण राजयोग म्हणतात. या योगाला अत्यंत शुभ असा योग मानला जातो. ज्याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनात धन, यश, प्रतिष्ठा आणि आदर तयार करतो. असे म्हटले जाते की, या योगामुळे व्यक्तीचे नशीब बदलते.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा योग खूप फायदेशीर आहे. सध्या शनि वक्री असल्याने तुमच्या राशीच्या पाचव्या घरात स्थित आहे तर तिसऱ्या आणि चौथ्या घराचा स्वामी असल्याने तो केंद्र त्रिकोण राजयोग देखील निर्माण करत आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना यश मिळू शकते. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायामध्ये किंवा कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल. तसेच हे लोक कामामध्ये जास्त व्यस्त राहतील. तसेच तुम्हाला कुटुंबासाठी वेळ देखील काढावा लागेल.
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक राहील. या लोकांच्या घरामध्ये मालमत्ता, कुटुंब आणि वाहन यांच्याशी संबंधित असणाऱ्यांना या योगाचा विशेष फायदा होईल. गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा व्यवसायासाठी कोणतेही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे. कुटुंबामध्ये सुरु असलेला कलह दूर होईल. घरात शांती आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)