फोटो सौजन्य- pinterest
धनाची देवी म्हणून लक्ष्मी देवीला संबोधिले जाते. प्रत्येक व्यक्तीला वाटते की देवी आपल्यावर प्रसन्न व्हावी पण तसे होत नाही. जर तुम्हाला काही खास संकेत मिळत असल्यास ते म्हणजे देवी तुमच्यावर प्रसन्न असल्याचे म्हटले जाते. देवी लक्ष्मी प्रसन्न असल्यास धनप्राप्ती संबंधात कोणते संकेत मिळतात ते जाणून घ्या
जर एखाद्या साधकाला धनप्राप्ती पाहिजे असल्यास त्याने दररोज सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर देवी लक्ष्मीची योग्यरित्या पूजा करावी. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि आनंद येतो. त्याचप्रमाणे साधकाला जीवनामध्ये शुभ संकेत देखील मिळतात. असे देखील म्हटले जाते की, ज्यावेळी देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्यावेळी व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर देखील होतात.
देवी लक्ष्मीचे वाहन घुबड आहे त्यामुळे घुबड दिसणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्हाला घरामध्ये घुबड येताना दिसले तर ते शुभ मानले जाते. वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार, घरामध्ये घुबड येताना दिसल्यास तुमच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता सर्वांत जास्त निर्माण होते.
जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर शंख वाजण्याचा आवाज आला तर ते खूप शुभ मानले जाते. शंखाचा आवाज ऐकू येणे हे एक मजबूत आर्थिक स्थितीचे लक्षण मानले जाते. कारण शंखाचा संबंध देवी लक्ष्मीशी असल्याचे म्हटले जाते. असे म्हटले जाते की, शंखाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली.
सनातन धर्मामध्ये पोपटाला शुभ, बुद्धिमत्ता आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. पोपटाचा संबंध देवी लक्ष्मीशी असल्याचे देखील म्हटले जाते. तुमच्या घरात पोपट असणे किंवा येणे हे एक शुभ चिन्ह मानले जाते. वास्तुशास्त्रा मते, घरात पोपट येणे म्हणजे कुटुंबातील सदस्यांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असणे असा त्याचा अर्थ होतो. तसेच हे लोक करत असलेले आर्थिक समस्येचा सामना देखील दूर होण्यास मदत होते.
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये कमळाचे फूल दिसणे खूप शुभ मानले जाते. कमळाच्या फुलाला धन आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते. कारण कमळाचे फूल देवी लक्ष्मीला प्रिय आहे. जर हे फूल आपल्याला स्वप्नात दिसले किंवा घरामध्ये लावले असल्यास व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि शांती येते. त्यासोबतच आर्थिक लाभ देखील होतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)