Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketu Gochar 2026: 25 जानेवारीपासून करावा लागणार तणाव आणि अडथळ्यांचा सामना, या राशींच्या लोकांनी राहावे सावध

केतू नक्षत्र बदलाच्या प्रभावामुळे काही राशींच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या सर्व कामात सावधगिरी बाळगावी लागेल. कोणत्या राशीच्या लोकांनी राहावे सावध जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 16, 2026 | 11:13 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • केतू बदलणार आपले नक्षत्र
  • या राशीच्या लोकांनी राहावे सावध
  • 25 जानेवारीपासून करणार नक्षत्र संक्रमण
 

रविवार, 25 जानेवारी रोजी पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात केतू ग्रह आपला प्रवास संपवणार आहे. तो या स्थानातून निघून या नक्षत्राच्या पहिल्या टप्प्यात आपले स्थान घेईल. केतुचे हे संक्रमण 26 मार्च 2026 पर्यंत प्रभावी असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, पूर्वाफाल्गुनी नक्षत्राचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि केतूच्या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांची आध्यात्मिक प्रगती शक्य आहे. दरम्यान, काहींसाठी हा काळ अडचणींचा असू शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आव्हाने, व्यवसायात मंदी, नातेसंबंधांमध्ये कलह आणि प्रवासात विविध अडचणी येऊ शकतात. केतूच्या नक्षत्र संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांनी राहावे सावध ते जाणून घ्या

कोणत्या राशीच्या लोकांनी राहावे सावध

मिथुन रास

केतुच्या नक्षत्रातील बदल या राशीच्या लोकांसाठी आव्हानांनी भरलेले राहील. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही समस्या तुमचा ताण वाढवतील. नवीन संधी मिळण्यास वेळ लागू शकतो. वैवाहिक जीवनात भावनिक समज असणे आवश्यक असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

Basant Panchami 2026: वसंत पंचमीच्या दिवशी राशीनुसार या गोष्टींचे करा दान, अडथळे होतील दूर

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांना या काळाच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रेमविवाहातील अडथळे तणाव निर्माण करतील. गुंतवणुकीमुळे तुम्हाला फायदा होईल. जास्त खर्च केल्याने तुमच्या वर्तनावर परिणाम होईल. तुम्हाला विशेषतः तुमच्या आरोग्यावर आणि नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. नातेसंबंधामध्ये अडचणी येऊ शकतात. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील. हा काऴ विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहील. सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये तु्म्ही सहभागी होऊ शकता.  मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

Mercury Transit: 17 जानेवारीपासून या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब, मिळेल धन-कीर्ती-यशाची साथ

मकर रास

मकर राशीच्या लोकांना हा काळ आव्हानात्मक राहणार आहे. नवीन नोकरी शोधण्यासाठी तुम्हाला थोडा जास्त वेळ वाट पहावी लागू शकते. कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतील. हंगामी आजारांपासून सावध रहा. आर्थिक व्यवहारात अत्यंत सावधगिरी बाळगा, अन्यथा तुम्हाला अनावश्यक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तसेच मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. चैनीच्या वस्तूंवरही खर्च होऊ शकतो. तुमच्या खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: 25 जानेवारीपासून तणाव वाढण्यामागे काय कारण आहे

    Ans: या काळात काही ग्रहांची स्थिती प्रतिकूल होत असल्याने मानसिक ताण, विलंब आणि अडथळे निर्माण होऊ शकतात.

  • Que: करिअर आणि नोकरीवर याचा काय परिणाम होऊ शकतो?

    Ans: कामात अडथळे, वरिष्ठांशी मतभेद, अपेक्षित निकाल न मिळणे किंवा प्रोजेक्टमध्ये विलंब होण्याची शक्यता असते

  • Que: केतू नक्षत्राच्या संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे

    Ans: केतू नक्षत्राच्या संक्रमणामुळे मिथुन, तूळ आणि मकर राशीच्या लोकांनी सावध राहावे

Web Title: Ketu gochar 2026 people of this zodiac sign should be careful from january 25th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Gajalakshmi Rajyog: गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, या राशींच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी
1

Gajalakshmi Rajyog: गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, या राशींच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी

Agni Purana: अग्निपुराणातील प्रमुख कथा आणि धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या महापुराणाची वैशिष्ट्ये
2

Agni Purana: अग्निपुराणातील प्रमुख कथा आणि धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या महापुराणाची वैशिष्ट्ये

आद्य शंकराचार्यांनी प्रतिष्ठापित केलेली ज्ञानाची अधिष्ठात्री देवी, जाणून घ्या इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्व
3

आद्य शंकराचार्यांनी प्रतिष्ठापित केलेली ज्ञानाची अधिष्ठात्री देवी, जाणून घ्या इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्व

Yogeshwari Devi: आदिशक्तीचे पवित्र स्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी, जाणून घ्या या देवीचा इतिहास
4

Yogeshwari Devi: आदिशक्तीचे पवित्र स्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी, जाणून घ्या या देवीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.