फोटो सौजन्य- pinterest
आज सोमवारी चंद्र सिंह राशीमधून कन्या राशीत संक्रमण करणार आहे. आजचा सोमवारचा स्वामी ग्रह चंद्र राहील. तर मंगळ कन्या राशीमध्ये संक्रमण करणार आहे. मंगळ ग्रह सिंह आणि नंतर कन्या राशीमध्ये धन योग तयार होईल. त्याचबरोबर मंगळ आणि केतूची यूती सिंह राशीमध्ये संपून जाईल. पूर्वाफाल्गुनी आणि उत्तराफाल्गुनी नक्षत्रांच्या योगामुळे लक्ष्मी योग तयार होत आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार आहे. त्याचबरोबर आज श्रावणातील शुक्ल चतुर्थी देखील आहे म्हणजेच विनायक चतुर्थी आहे यालाच दुर्वा गणपती चतुर्थी असे देखील म्हटले जाते. यावेळी लक्ष्मी योग आणि महादेवाच्या आशीर्वादाने काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. तर काहींना करिअरपासून व्यवसायापर्यंत नशिबाची साथ लाभेल. कोणत्या राशीच्या लोकांना आज फायदा होईल आणि नशिबाची साथ लाभेल, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवारचा दिवस चांगला राहणार आहे. या लोकांमधील आत्मविश्वास वाढलेला राहील. रिअल इस्टेट, प्रॉपर्टी डीलिंग, ट्रान्सपोर्ट इत्यादी कामांशी संबंधित असलेल्या लोकांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला आज खूप मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास राहणार आहे. तुमची बुद्धिमत्ता, आत्मविश्वास आणि जोखीम घेण्याची क्षमता प्रभावशाली लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. तसेच कामानिमित्त तुम्ही बाहेर प्रवास करु शकतात. व्यवसायानिमित्त तुम्ही बाहेर प्रवास करु शकता. प्रकाशन, लेखन इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्यांना लोकांना अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. करिअर आणि व्यवसायानिमित्त तुम्ही परदेशात जाऊ शकता. तुमचा समाजात आदर आणि प्रतिष्ठा वाढलेली राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमच्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील. तसेच तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात चांगला फायदा होईल. सरकार आणि प्रशासनाशी संबंधित कामांनाही अपेश्रित यश मिळेल. कंत्राटी काम करणाऱ्यांसाठी अपेक्षेपेक्षा चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोक चांगली कामगिरी करु शकतात. आज कुटुंबात अनुकूल वातावरण राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)