
फोटो सौजन्य- pinterest
मंगळ वृश्चिक राशीमध्ये संक्रमण करणार आहे. 27 ऑक्टोबर रोजी मंगळ तूळ राशी सोडून स्वतःच्या वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या संक्रमणामुळे रुचक राजयोग तयार होईल. ज्यावेळी मंगळ स्वतःच्या राशीत प्रवेश करतो त्यावेळी रुचक राजयोग तयार होतो. यावेळी मंगळ ग्रह 7 डिसेंबरपर्यंत मंगळ वृश्चिक राशीत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, रुचक राजयोगाचा प्रभाव खूप प्रभावी मानला जातो. रुचक राजयोग व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या बळकट करतो आणि धैर्य, आत्मविश्वास, उच्च पद, संपत्ती आणि नेतृत्व क्षमता देखील वाढवतो. मंगळाचे हे संक्रमण मिथुन आणि कन्या राशीसह या राशीच्या लोकांना पद, प्रतिष्ठा, कौटुंबिक आनंद आणि यश मिळवून देईल. मंगळ संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये सहाव्या घरात संक्रमण करणार आहे. त्यामुळे त्याच्या संक्रमणाचा परिणाम या राशीच्या लोकांवर सकारात्मक होणार आहे. या काळात तुम्ही सोने आणि इतर वस्तू देखील खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला लक्षणीय फायदे देखील होतील. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. त्यामुळे तुमचा प्रभाव देखील वाढू शकतो.
मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये तिसऱ्या घरामध्ये संक्रमण करत आहे. कन्या राशीच्या लोकांना सामान्यतः सकारात्मक परिणामांची अपेक्षा असू शकते. तुमचा आत्मविश्वास वेगाने वाढेल. तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळू शकते. यामुळे तुम्ही भाग्यशाली राहू शकतात. तुमच्या शत्रूंवर विजय मिळवण्याची संधी देखील तुम्हाला मिळेल. या संक्रमणाचा तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो.
मकर राशीमध्ये हे संक्रमण अकराव्या घरात होत आहे. यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. तुम्हाला महत्त्वपूर्ण लाभ देखील मिळू शकतात. तुम्ही तुमची सर्व कामे अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण कराल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमच्या आरोग्यातही सुधारणा दिसून येतील. स्पर्धेत तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या जवळच्या लोकांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.
मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये दहाव्या घरात संक्रमण करत आहे. यामुळे तुमच्या कामाच्या पद्धतीत सुधारणा होईल. तसेच तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. या काळात तुम्ही खूप मेहनत घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला या संक्रमणाचा चांगला फायदा होऊ शकतो.
मीन राशीमध्ये हे संक्रमण नवव्या घरात होणार आहे त्यामुळे हे संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. या संक्रमणाचा परिणाम मिश्र राहणार आहे. शिवाय, तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुमची कामे यशस्वीरित्या पूर्ण कराल. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. भूतकाळातील अनुभवांचा तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)