फोटो सौजन्य- pinterest
मंगळ ग्रह लवकरच आपली राशी बदलेल. सोमवार, 28 जुलै रोजी तो कन्या राशीमध्ये प्रवेश करेल. त्याआधी तो बुधवार, 23 जुलै रोजी मंगळ आपले नक्षत्र बदलणार आहे. त्यावेळी तो उत्तराफाल्गुनी नक्षत्रात आपले स्थान निर्माण करेल. उत्तराफाल्गुनी नक्षत्राचा स्वामी ग्रह सूर्य असल्याने मंगळ स्वतः सूर्याच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत आहे. ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, मंगळ आणि सूर्य यांच्यामध्ये मैत्रीची भावना असल्याने मंगळाच्या नक्षत्रातील हा बदल काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. दोन्ही ग्रहांच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ, शत्रूंवर विजय आणि इच्छित रोजगार मिळू शकतो. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या
मंगळ ग्रहाचे नक्षत्रातील बदल मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ असणार आहे. या काळामध्ये तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतील. करिअरमध्येही चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. मंगळाच्या प्रभावामुळे तुम्ही तुमच्या विरोधकांना उत्तर देण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकतात. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
सिंह राशीच्या लोकांना मंगळ ग्रहाच्या नक्षत्रातील बदलामुळे या लोकांना अपेक्षित फायदा होईल. समाजामध्ये या लोकांची प्रतिष्ठा वाढेल. या लोकांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये गोडवा टिकून राहील. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. तुमची जी अडकलेले कामे आहेत पूर्ण होतील. आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यावसायिक कौशल्यामुळे तुम्हाला अपेक्षित नफा मिळू शकेल. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील.
मंगळ ग्रहाच्या नक्षत्रातील बदलामुळे हा काळ तूळ राशीच्या लोकांसाठी खास असू शकतो. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. वाहन खरेदी करण्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. तुम्ही या काळात जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित लाभ मिळेल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला अचानक भेटवस्तू मिळू शकेल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला राहील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)