Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manudevi Temple: कुलदेवता म्हणून पूजली जाते मनूदेवी; जळगावच्या या मंदिराची पौराणिक कथा आणि इतिहास जाणून घ्या

जळगावच्या यावल तालुक्यात सातपुड्याच्या निसर्गरम्य कुशीत वसलेलं श्री मनूदेवी मंदिर हे खानदेशातील श्रद्धेचं प्रसिद्ध ठिकाण आहे. कुलदेवता म्हणून पूजल्या जाणाऱ्या मनूदेवीच्या मंदिराला धार्मिक महत्त्वासोबतच डोंगर, धबधबा आणि हिरवाईमुळे निसर्गप्रेमींचीही पसंती मिळते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 11, 2026 | 10:15 AM
फोटो सौजन्य- गुगल

फोटो सौजन्य- गुगल

Follow Us
Follow Us:
  • मनूदेवी मंदिर कुठे आहे?
  • मनूदेवी मंदिराची पौराणिक कथा
  • मनूदेवी आणि महिषासुराचा संबंध काय?
 

 

जळगाव जिल्ह्यातील यावळ तालुक्यात सातारा पर्वतरांगेच्या निसर्ग पर्वतरांगेत बसलेलं श्री मनूदेवी मंदिर हे खानदेशातील एक श्रद्धेचं महत्त्वाचं ठिकाण आहे. अनेक कुटुंबाची कुलदेवता म्हणून मनूदेवीची श्रद्धेने पूजा केली जाते. धार्मिक महत्त्वाबरोबरच डोंगर, धबधबा, हिरवाई आणि शांत वातावरण म्हणूनच हे ठिकाण निसर्गप्रेमीसाठी देखील आकर्षण आहे.

मनूदेवी मंदिर कुठे आहे

मनूदेवी मंदिर आडगाव तालुका यावल जिल्हा जळगाव परिसरात आहे. यावल चौपडा मार्गावरून आडगाव पाट्याजवळून मंदिराकडे जाता येतं. आडगाव पट्ट्यापासून मंदिर साधारण नऊ किलोमीटर अंतरावर आहे तर जळगाव शहरापासून हे मंदिर सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेल्याची माहिती जळगाव जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मंदिर सुमारे 500 मीटक उंचीवरती आहे आणि इथे जाताना काही भाग वाहनाने जाता येण्यासारखा आहे मात्र शेवटचा काही भाग हा पायी चढूनच जावा लागतो.

Saptashrungi Devi: काय आहे सप्तश्रृंगी देवीचा महिमा आणि कथा, जाणून …

मनूदेवीशी संबंधित कथा

मनूदेवीशी संबंधित प्रसिद्ध कथा आहे ती म्हणजे देवी भागवत पुराणातील आख्यायिकेशी संबंधित. मंदिर आणि जिल्हा प्रशासनाच्या माहितीतही याचा समावेश आहे. एकदा ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्यावरती राक्षसाच्या दासाच मोठं संकट आलं. पृथ्वीवरील जनतेलाही या संकटातून मुक्त करण्याची आवश्यकता होती. या संकटावरती उपाय शोधण्यासाठी विधेय सातपुड्याच्या पर्वत रांगांमधील एका फक्तु गुहेत गेले तेथे त्यांनी ध्यानधारणा केली. त्यांच्या तपश्चर्येतून आणि श्वासातून एक तेजस्वी शक्ती प्रकट झाली. या दिव्य तेजाचं रुपांतर एका देवीच्या रुपात झालं आणि या शक्तीला मनूदेवी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या कथेनुसार मनूदेवी म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्या संयुक्त शक्तीचं रुप मानलं जातं.

Saptashryngi Devi: काय आहे देवी सप्तशृंगीच्या तिरक्या मानेचे रहस्य, जाणून घ्या

मनूदेवीच्या आख्यायिकेत पुढे तिच्या महिषासुरा विरुद्धच्या संघर्षाची कथा येते. मनूदेवीने राक्षसी शक्तींचा नाश करण्याचा संकल्प केला तिच्या या रुपाचा संबंध पुढे अष्टभूजा देवी, नांद्रा देवी, पाटणा देवी आणि सप्तशृंगी देवी यांच्या परंपराशी जोडला जातो. म्हणजे एका आख्यायिकेनुसार देवीची शक्ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रुपात प्रकट होत गेली आणि अखेरीस सप्तशृंगी पर्वतरांगामध्ये महिषासुराचा वध झाला अशी धार्मिक परंपरा सांगते. ही कथा लोकपंरपरेतील आख्यायिका आणि पौराणिक कथा म्हणून सांगितली जाते.

प्राचीन इतिहासाची साक्ष

मनूदेवी मंदिराची प्राचीनता, अवशेष उत्खन्नात सापडलेल्या मूर्ती आणि शिल्पामधून दिसून येते. येथील माहितीनुसार या तीर्थक्षेत्राचा शोध इ.स 1251 मध्ये इंगळे घराण्याचे पूर्वज पांडू जीवन इंगळे यांनी घेतल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या बांधकामाबाबात हेमांडपंथी बांधकामाचा उल्लेख आढळतो. मंदिराभोवती पूर्वी मोठी तटबंधी घातल्याचे देखील सांगितले जाते. परिसरात अनेक जुन्या विहिरी असून मंदिराचा सभामंडप आणि आवारा देखील मोठ्या आकाराचे असल्याची नोंद आहे. मनूदेवीच्या मंदिराची खासियत म्हणजे देवीचे दर्शन आणि सातपुड्याचा निसर्ग हे दोन्ही एकाच ठिकाणी अनुभवता येतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Manudevi temple mythology history glory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Jalgaon

संबंधित बातम्या

Mati Bhram Yog: कन्या राशीत बुध-चंद्र युतीमुळे या राशींचा वाढणार ताण, धन आणि नातेसंबंधांवर होणार नकारात्मक परिणाम
1

Mati Bhram Yog: कन्या राशीत बुध-चंद्र युतीमुळे या राशींचा वाढणार ताण, धन आणि नातेसंबंधांवर होणार नकारात्मक परिणाम

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Shukra Nakshatra Parivartan: शुक्राचा स्वाती नक्षत्रात प्रवेश; या राशींच्या लोकांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता
3

Shukra Nakshatra Parivartan: शुक्राचा स्वाती नक्षत्रात प्रवेश; या राशींच्या लोकांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता

Jalgaon News: बैलपोळ्याच्या उत्साहाने डॉ. उल्हास पाटील कृषि परिसर दुमदुमला!
4

Jalgaon News: बैलपोळ्याच्या उत्साहाने डॉ. उल्हास पाटील कृषि परिसर दुमदुमला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.