Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Margashirsha Guruvar 2024 : मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्यामूळे उद्यापन करावे की नाही महिलांमध्ये संभ्रम?

मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारचे व्रत आज 26 डिसेंबर रोजी केले जाणार आहे. या दिवशी सफाळा एकादशीचे व्रत देखील पाळले जाणार आहे. ही दोन्ही व्रत एका दिवशी आल्यामुळे महिलांमध्ये उद्यापणाबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 26, 2024 | 04:55 AM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

मार्गशीर्ष महिना सुरु आहे. संपत्ती, संतती आणि सन्मती मिळावी यासाठी महिला मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करण्यात येत आहे. मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. 5 डिसेंबरला सुरु झालेला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारचे उद्यापन करण्यात येते. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन करुन हळदीकुंकू करण्यात येते. यावेळी शेवटच्या गुरुवारी एकादशीचे व्रतदेखील आले आहे. एकादशीचे व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडले जाते. त्यामुळे गुरुवारचं व्रत आणि त्याच उद्यापन करावे की नाही याबद्दल महिलांमध्ये संभ्रम आहे.

उपवास आणि उद्यापन करावे की नाही

मार्गशीर्ष गुरुवार आणि सफाळा एकादशी व्रत हे पूर्णपणे वेगळे व्रत आहे. या दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ज्या लोकांचा एकादशीचं व्रत नाही त्यांनी मार्गशीर्ष गुरुवारी नेहमीप्रमाणे देवीची उपासना करून उद्यापन करावे आणि नैवेद्य दाखवावा.

प्रदोष व्रत संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गुरुवार आणि एकादशीचा उपवास कसा करायचा

ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी पूजा करुन फक्त तीर्थ घ्यावे आणि रात्री उपवासाचे पदार्थ खावे. ज्या महिलांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करुन उद्यापन करुन नैवेद्य दाखवावा आणि नैवेद्याचे ताट गाईला द्यावे त्यानंतर एकादशीचा उपवास पुढे चालू ठेवावा.

शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने अकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केलाय. मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन आणि हळदीकुंकू करण्यात काहीही फरक नाही.

सफाळा एकादशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गुरुवारी पूजेची मांडणी कशी करावी

जिथे पुजा मांडायची आहे तिथे गोमुत्र किंवा गंगाजल शिंपडून जागा स्वच्छ करावी. त्यानंतर रांगोळी काढा. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा. चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करा. आता मध्यभागी तांदूळ ठेवून कळश स्थापन करा. कळशात दुर्वा, पैसे आणि सुपारी घाला. आंब्याची पाच पान ठेवून त्यावर नारळ ठेवावा. या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकता. अगदी कळशाला ब्लाऊज पीसने सजवा. आता लक्ष्मीला दागिन्यांनी शृंगार करा. कळशाला चारही बाजून हळदीकुंकू लावा. हा नारळ म्हणजे विष्णू भगवंत असतात.

त्यानंतर तुमच्याकडे लक्ष्मीमातेचा मुखवटा असेल तर तो तुम्ही मांडू शकता किंवा लक्ष्मीचा फोटो, यंत्र किंवा छोटी मूर्तीही तुम्ही ठेऊ शकता. तिला छान सजवून देवीपुढे पाच फळं, लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी. तसंच देवीपुढे पाच पानांचा विडा ठेवावा. नैवेद्य म्हणून लाह्या, गुळ, बाताशे, छोट्या पेल्यात दूध-साखर नक्की ठेवावे.

( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

 

Web Title: Margashirsha guruvar 2024 women confusion about fast guruvar udyapan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 04:55 AM

Topics:  

  • dharm
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा
1

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा

Janmashtami Dream Meaning: स्वप्नात श्रीकृष्ण बासरी वाजवताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या
2

Janmashtami Dream Meaning: स्वप्नात श्रीकृष्ण बासरी वाजवताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या
3

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Shukra Gochar: तूळ राशीत शुक्राचा प्रवेश; या राशींनी राहावे सावध, ज्योतिषांनी सांगितले उपाय
4

Shukra Gochar: तूळ राशीत शुक्राचा प्रवेश; या राशींनी राहावे सावध, ज्योतिषांनी सांगितले उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.