Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Margashirsha month: मार्गशीर्ष महिन्यात कृष्णाची भक्ती शाश्वत फळ का देते? काय आहे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

यावेळी हिवाळ्याची सुरुवात होते आणि हा महिना श्रीकृष्णाचा आवडता महिना आहे. शास्त्रांमध्ये या महिन्यात पूजा आणि दान करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. जाणून घ्या मार्गशीर्ष महिन्यात कृष्णाची भक्ती शाश्वत फळ का देते

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 23, 2025 | 02:56 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मार्गशीर्ष महिना का आहे फायदेशीर
  • मार्गशीर्ष महिन्यात कृष्णाची भक्ती शाश्वत फळ का देते
  • मार्गशीर्ष महिन्याचे धार्मिक महत्त्व
 

हिंदू पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात शुक्रवार, 21 नोव्हेंबरपासून झाला आहे आणि 19 डिसेंबर रोजी हा महिना संपणार आहे. हा महिना कार्तिक नंतर लगेच आणि पौष महिन्याच्या आधी येतो, म्हणून हा महिना हिवाळ्याची सुरुवात दर्शवितो.

यावेळी हवामान शांत आणि सात्विक असते, ज्यामुळे मन सहजपणे भक्ती आणि ध्यानात स्थिर होते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये सकाळी स्नान करणे, दान करणे, दिवे दान करणे, तुळशीची पूजा करणे आणि नियमितपणे भगवान विष्णूची पूजा करणे याचे विशेष महत्त्व शास्त्रांमध्ये सांगितले आहे. या काळात केलेले कोणतेही शुभ कार्य बहुगुणी फायदेशीर मानले जाते.

गीता उपदेशाशी संबंधित आहे हा काळ

मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना मानला जातो. कारण तो गीतेच्या शिकवणीचा काळ मानला जातो. परंपरेनुसार, भगवान श्रीकृष्णाने या महिन्यात भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला धर्म, कर्तव्य आणि सत्याचे दिव्य ज्ञान दिले. म्हणूनच, मार्गशीर्ष ज्ञान, आत्म-साक्षात्कार आणि धार्मिकतेच्या प्रकाशाचे प्रतीक बनले. भगवान स्वतः गीतेत म्हणाले, “मसानाम् मार्गशीर्षोहम्,” म्हणजे, “महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे.” हे विधान या महिन्याचे दिव्यत्व आणखी दृढ करते.

Margshirsh Month: मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाणारी देवदिवाळी; अनेक महिला गुरुवारी करतात देवी लक्ष्मीचे व्रत

कृष्ण भक्तीसाठी सर्वोत्तम असतो हा काळ

मार्गशीर्षचा महिना श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. या महिन्यात, विशेषतः दर गुरुवारी, उपवास करणे, पूजा करणे आणि विष्णू सहस्रनाम पठण करणे यासाठी महत्त्वाचा मानला जातो. असे केल्याने मनातील अस्वस्थता कमी होते, जीवनात शांती वाढते आणि घरात स्थिरता येते. भगवान श्रीकृष्ण हे स्वतः भगवान विष्णूचे अवतार असल्याने हा महिना त्यांना विशेष प्रिय मानला जातो.

दानधर्मासाठी फायदेशीर महिना

धर्मग्रंथांमध्ये मार्गशीर्ष महिन्याचे वर्णन दानधर्मासाठी सर्वोत्तम महिना मानला जातो. या काळात अन्न, वस्त्र, दिवे दान करणे किंवा गरजूंना मदत करणे हे अनेक पटींनी जास्त फळ देते. या महिन्यात केलेले दान मन शुद्ध करते आणि पूर्वज आणि देव दोघांनाही संतुष्ट करते असे मानले जाते. म्हणूनच या महिन्याला “पुण्य संचय करण्याचा काळ” असेही म्हटले जाते.

Surya Gochar 2025: वर्षाच्या शेवटच्या दिवसांत सूर्याचे करणार संक्रमण, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी

मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय करावे

सकाळी स्नान करून झाल्यानंतर तुळशीच्या पानांनी भगवान विष्णूची पूजा केल्याने मन आणि वातावरण दोन्ही शुद्ध होते.

ॐ नमो भगवते वासुदेवाय” किंवा “ॐ विष्णवे नमः” या मंत्राचा नियमित जप केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

त्याचप्रमाणे दर गुरुवारी उपवास करावा आणि पिवळे कपडे परिधान करुन पूजा करावी, यामुळे गुरुऊर्जा बळकट होते आणि जीवनात स्थिरता वाढते.

मार्गशीर्ष महिन्यात गरजूंना अन्न, वस्त्र आणि दिवे दान करणे अत्यंत फायदेशीर ठरते. दररोज गीतेतील एका श्लोकाचे पठण केल्याने ज्ञान, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक शक्ती वाढते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मार्गशीर्ष महिना कोणत्या देवाची उपासना करण्यासाठी शुभ मानला जातो

    Ans: मार्गशीर्ष महिना श्रीकृष्ण यांची उपासना करण्यासाठी शुभ मानला जातो

  • Que: मार्गशीर्ष महिन्यात कोणते विशेष पूजन करावे

    Ans: मार्गशीर्ष पूजन श्रीकृष्ण पूजन, तूळशीला अभिषेक आणि भागवत गीता पठण

  • Que: या महिन्यात कोणत्या मंत्रांचा जप करावा

    Ans: ओम नमो भागवते वासुदेवाय या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. त्यामुळे मनोबल सुख आणि समृद्धी वाढते

Web Title: Margashirsha month why devotion to krishna gives eternal fruit religious significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Ketu Transit: केतूच्या संक्रमणामुळे या राशींच्या अडचणी होतील दूर; नोकरी, गाडी घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण
1

Ketu Transit: केतूच्या संक्रमणामुळे या राशींच्या अडचणी होतील दूर; नोकरी, गाडी घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण

Papankusha Ekadashi 2026: पापांकुशा एकादशीला भगवान विष्णूंच्या या रूपाची केली जाते पूजा; जाणून घ्या महत्त्व
2

Papankusha Ekadashi 2026: पापांकुशा एकादशीला भगवान विष्णूंच्या या रूपाची केली जाते पूजा; जाणून घ्या महत्त्व

Numberlogy: नवरात्रीच्या आठव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: नवरात्रीच्या आठव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती
4

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.