Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monday Puja: शिवलिंगावर कोणती फुले अर्पण करावीत आणि कोणती टाळावीत? जाणून घ्या नियम

भगवान शिव शंकराची सोमवारी मनोभावे पूजा केली जाते. कोणी मंदिरात जाऊन करतो. तर कोणी घरातच करतो. पण पूजेत भगवान शंकराला कोणती फुले अर्पण करावीत, कोणते फुल अर्पण करू नये, जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 20, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शिवपूजेमध्ये कोणत्या फुलाचा वापर करावा
  • कोणत्या फुलाचा वापर करू नये
  • शिवपूजेत फुलांचा वापर करण्याचे महत्त्व
 

 

 

हिंदू धर्मात प्रत्येक पूजेला एक विशिष्ट महत्त्व आहे. मग ती गणपतीची असो महादेवाची किंवा देवीची प्रत्येक देवाला आवडणार फुलं त्यात असल्यास ती पूजा अधिक फलदायी ठरते. त्या पूजेला एक महत्त्व प्राप्त होते. त्याचबरोबर भक्तालाही देवाचा प्रसाद लवकर मिळतो.

शिव शंकराची पूजा करताना पांढरी आणि सुगंधित फुले अर्पण करणे शुभ मानले जाते. महादेव हे अत्यंत भोळे असून ते साध्या भक्तीने आणि विशिष्ट फुलांनी प्रसन्न होतात. शिव पूजेत अर्पण करावयाची मुख्य फुले आणि त्यांची कारणे जाणून घेऊया

धतुरा फूल (Datura Flower)

महादेवाला धतुराचे फूल अत्यंत प्रिय आहे. या फुलाचा उगम शिवाच्या छातीतून झाला असल्याचे मानले जाते. हे फूल अर्पण केल्याने जीवनातील विषारी विचार (अहंकार, मत्सर) दूर होतात.

पांढरी रुई (Calotropis/Aak Flower)

पांढऱ्या रुईची फुले शिवाच्या पूजेत विशेष मानली जातात. या फुलांनी पूजा केल्याने मोक्ष मिळतो आणि व्यभिचाराचे दोष नष्ट होतात, असे मानले जाते.

Chandra Gochar:  चंद्राने केला वृषभ राशीमध्ये प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार अपेक्षित यश

बेलची पाने आणि फुले (Bel Leaves/Bilva Patra)

जरी हे फूल नसले तरी, बेलपत्र शिवाच्या पूजेत अनिवार्य आहे. यामुळे पाप नाहीसे होतात.

कणेरी फुल (Kaneri flower)

शिवाच्या पूजेमध्ये कणेरी फुल असणं हे शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की पांढरे आणि लाल फुल वाहिल्यामुळे देव प्रसन्न होतो.

मोगरा आणि चमेली (Jasmine)

मोगऱ्याचे पांढरे फूल हे शुद्धतेचे प्रतीक आहे, त्यामुळे ते शिवाला अर्पण केले जाते.

कोणती फुले वाहू नयेत?

सूर्यफूल

शिवलिंगावर सूर्यफूल वाहण्यास मनाई केली जाते. कारण सूर्यफूल हे शाही मानले जाते. त्यामुळे शाही स्वरुपाशी संबंधित असलेल्या गोष्टी शिव पूजेमध्ये वापरल्या जात नाहीत.

Numberlogy:  मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

कमळ फूल

भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना आपण कमळाचे फूल वाहतो. त्यामुळे शिवलिंगावर कधीही कमळ फूल ठेवू नये असे म्हटले जाते.

काटेरी फूल

धतुराशिवाय कोणतेही काटेरी फुल भगवान शिव यांना अर्पण करू नये असे म्हटले जाते. हे फूल वाहिल्यास कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता असते.

केतकीचे फुल

शिवपूजेत केतकीचे फूल कधीही वापरू नये, असे धर्म शास्त्रात सांगितले आहे. यामागे एक पौराणिक कथा आहे.

श्रद्धेनुसार, शिवाला साधे, कमी सुगंधी परंतु पांढऱ्या रंगाचे फूल अधिक आवडतात, जे मन शांत करतात आणि भक्तीभाव वाढवतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिव पूजेत फुलांचे महत्त्व काय आहे?

    Ans: शिवपूजेत फुले ही भक्ती, शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जातात. योग्य फुले अर्पण केल्याने पूजा अधिक फलदायी होते.

  • Que: शिवलिंगावर कोणती फुले अर्पण करावीत?

    Ans: धतुरा, पांढरी रुई (आक), बेलपत्र, कणेरी फुले, मोगरा आणि चमेली ही फुले शिवाला प्रिय मानली जातात.

  • Que: कोणती फुले शिवलिंगावर अर्पण करू नयेत?

    Ans: केतकीचे फूल, कमळ, सूर्यफूल इतर काटेरी फुले (धतुराशिवाय)

Web Title: Monday puja rules on which flowers to offer on shivlinga and which ones to avoid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Trikal Sandhya: त्रिकाल संध्या म्हणजे काय? प्रातः, माध्यान्ह आणि सायंसंध्येचे महत्त्व जाणून घ्या
1

Trikal Sandhya: त्रिकाल संध्या म्हणजे काय? प्रातः, माध्यान्ह आणि सायंसंध्येचे महत्त्व जाणून घ्या

Chanakya Niti: लग्नाआधी मुलाची कमाईच नाही, ‘या’ 5 गोष्टी नक्की तपासा; चाणक्य नीतीत दिला आहे खास सल्ला
2

Chanakya Niti: लग्नाआधी मुलाची कमाईच नाही, ‘या’ 5 गोष्टी नक्की तपासा; चाणक्य नीतीत दिला आहे खास सल्ला

Mangalsutra: शुभ कामात काळा रंग वर्ज्य, मग मंगळसूत्रात काळे मणी का असतात? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक मान्यता
3

Mangalsutra: शुभ कामात काळा रंग वर्ज्य, मग मंगळसूत्रात काळे मणी का असतात? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक मान्यता

Balram Jayanti: श्रीकृष्णाचे भाऊ बलराम ‘हलधर’ म्हणून का ओळखले जातात? जाणून घ्या पौराणिक कथा
4

Balram Jayanti: श्रीकृष्णाचे भाऊ बलराम ‘हलधर’ म्हणून का ओळखले जातात? जाणून घ्या पौराणिक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.