Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monthly Horoscpoe: सर्व राशींच्या लोकांसाठी ऑगस्टचा महिना कसा राहील ते जाणून घ्या

२०२६ मधील आठवा महिना ऑगस्ट. हा महिना व्यवसाय, कुटुंब, आरोग्य, शिक्षण, करिअर, प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 01, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

 

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती दर महिन्याला बदलते. आजपासून ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली आहे. पंचांगानुसार ऑगस्ट महिना श्रावण महिन्याचा असतो. मेष राशीचे लोक नवीन योजना आखून यश मिळवू शकतात, तर वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिकदृष्ट्या खूप चांगला असेल. या महिन्यात मिथुन राशीच्या लोकांना करिअरच्या नवीन संधी मिळतील, तर कर्क राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, पण त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवीन टप्पे गाठण्याची प्रेरणा मिळेल, तर अविवाहित कन्या राशीच्या लोकांना नवीन जोडीदार मिळू शकतो. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी ऑगस्टचा महिना कसा असेल जाणून घ्या

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना शुभ राहणार आहे. या महिन्यात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. जर तुम्ही मालमत्ता, करिअर किंवा व्यवसायाबद्दल तणावात असाल, तर आता त्यावर तोडगा निघण्याची आशा आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी अनेक चांगल्या संधी मिळतील. अविवाहित व्यक्तींसाठी नवीन नातेसंबंध जुळण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना या महिन्यात चांगल्या संधी मिळतील आणि त्यांच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. या महिन्यात गुंतवणूक करणे टाळा अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.

वृषभ रास

वृषभ राशींच्या लोकांसाठी ऑगस्टचा महिना चढ उताराचा राहू शकतो. हा काळ करिअर आणि व्यवसायासाठी फारसा अनुकूल नाही. कामाच्या आव्हानांमध्ये मानसिक संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. नोकरदार व्यक्तींनी महिन्याच्या मध्यात भावनिक निर्णय घेणे टाळावे. कामात किंवा जबाबदाऱ्यांमध्ये अचानक बदल होण्याची शक्यता आहे.  तुमच्या मुलांबद्दलची चिंता कायम राहू शकते. गोंधळ किंवा गैरसमजांमुळे प्रेमसंबंधात गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

मिथुन रास

मिथुन राशींच्या लोकांसाठी ऑगस्टचा महिना शुभ राहणार आहे. यावेळी तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला वरिष्ठ व कनिष्ठ दोघांकडूनही पाठिंबा मिळेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल प्रशंसा आणि आदर मिळण्याची शक्यता असते. न्यायालयातील खटल्यांचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जमीन किंवा घर खरेदी करणे किंवा विकणे अपेक्षित यश मिळू शकते. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्याची सुरुवात धावपळीची आणि मानसिक तणावाची असू शकते. या काळात आपल्या रागावर आणि अहंकारावर नियंत्रण ठेवा. यावेळी तुम्ही प्रवास करू शकता. बेरोजगार व्यक्तींना रोजगार मिळवण्याच्या चांगल्या संधी आहेत. जमीन किंवा घराची खरेदी-विक्री फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारेल.

Numberlogy: ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

सिंह रास

सिंह राशींच्या लोकांसाठी ऑगस्टचा महिना संमिश्र राहील. व्यावसायिकांना लांबचा प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे थकवा आणि तणाव वाढू शकतो, परंतु आर्थिक आवक सुरूच राहील. व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात आणि बाजारात स्पर्धा वाढू शकते. नातेसंबंधामध्ये तणाव जाणवू शकतो. आरोग्याच्या बाबतीतही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. दीर्घकालीन आजार किंवा हंगामी संसर्गामुळे त्रास होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांनी कामात निष्काळजीपणा टाळावा.

कन्या रास

ऑगस्ट महिना कन्या राशींच्या लोकांसाठी चांगला राहील. महिन्याच्या सुरुवातीला कामासंबंधित प्रवास होण्याची शक्यता आहे, जो यशस्वी आणि फायदेशीर ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात आणि पूर्वी अडकलेले पैसेही परत मिळवता येऊ शकतात. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या कामात किंवा परदेश प्रवासाशी संबंधित योजनांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही परदेशात नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही एक अनुकूल वेळ आहे.

तूळ रास

ऑगस्ट महिना तूळ राशींच्या लोकांसाठी चांगला राहील. या काळात तुम्हाला नवीन संधी मिळतील. तसेच तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. आरोग्य आणि मालमत्तेच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. तुमच्या आहाराकडे लक्ष द्या आणि कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळा.

वृश्चिक रास

ऑगस्ट महिना वृश्चिक राशींच्या लोकांसाठी चढ उताराचा असू शकतो. नोकरदारांना पाठिंब्याचा अभाव जाणवू शकतो, पण त्यांनी आत्मविश्वासाने आणि एकाग्रतेने पुढे वाटचाल करावी. करिअर आणि व्यवसायासाठी हा महिना चांगला राहील. तुमच्या जोडीदारासोबत असलेले गैरसमज दूर होऊ लागतील. या महिन्यात तीर्थयात्रा किंवा प्रवासाची शक्यता आहे.

धनु रास

धनु राशींच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना शुभ राहणार आहे. करिअर आणि व्यवसाय अनुकूल राहील आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. तुम्हाला एखादा सन्मान मिळू शकतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि व्यावसायिक वर्गाला नफा मिळून त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. शासकीय किंवा विभागीय अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे तणाव वाढू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये वाद टाळा आणि नात्यातील गोडवा टिकवून ठेवा.

August Festivals List 2026: नागपंचमी ते रक्षाबंधनापर्यंत ऑगस्ट महिन्यातील सणांची यादी

मकर रास

मकर राशींच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना संमिश्र राहणार आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण न केल्यास तुम्हाला तुमच्या वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, कारण अगदी लहानसा निष्काळजीपणासुद्धा तुमच्या कामगिरीवर परिणाम करू शकतो. प्रेमाच्या बाबतीत संयम बाळगा आणि भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा. कला, लेखन किंवा माध्यम क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी फायदेशीर आहे.

कुंभ रास

ऑगस्ट महिना कुंभ राशींच्या लोकांसाठी अनुकूल राहील. पद आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे. कामासाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी प्रवास करावा लागू शकतो. मात्र, ही धावपळ थोडी थकवणारी ठरू शकते. कौटुंबिक तणाव किंवा घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याबद्दल चिंता असू शकते.

मीन रास

ऑगस्ट महिना मीन राशींच्या लोकांसाठी संमिश्र राहील. कोणतीही मोठी जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी तिच्या परिणामांचा विचार करा. नवीन मित्रांच्या नादात जुन्या नात्यांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा महिन्याच्या अखेरीस तुमचा आर्थिक भार वाढू शकतो. वैवाहिक जीवनात सुसंवाद टिकवण्यासाठी, आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घ्या आणि त्यांना पुरेसा वेळ द्या.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Monthly horoscpoe how will august be for people of all zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • dharm
  • month
  • Religion

संबंधित बातम्या

Numberlogy: ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

August Festivals List 2026: नागपंचमी ते रक्षाबंधनापर्यंत ऑगस्ट महिन्यातील सणांची यादी
2

August Festivals List 2026: नागपंचमी ते रक्षाबंधनापर्यंत ऑगस्ट महिन्यातील सणांची यादी

Hindu Beliefs: देव्हाऱ्यात ठेवलेल्या नारळाला कोंब फुटणे म्हणजे नेमके काय? काय सांगते धर्मशास्त्र
3

Hindu Beliefs: देव्हाऱ्यात ठेवलेल्या नारळाला कोंब फुटणे म्हणजे नेमके काय? काय सांगते धर्मशास्त्र

Kumbhakarna Story: कुंभकर्ण सहा महिने का झोपायचा? जाणून घ्या ब्रह्मदेवांच्या वरदानामागील पौराणिक कथा
4

Kumbhakarna Story: कुंभकर्ण सहा महिने का झोपायचा? जाणून घ्या ब्रह्मदेवांच्या वरदानामागील पौराणिक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.