Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिता जळताना कवटी फुटण्याची वाट का पहिली जाते? जाणून घ्या कपालक्रियेचे रहस्य आणि धार्मिक दृष्टीकोन

चिता दहनाच्या वेळी कवटीला तडे जाणे हा आत्ममुक्तीचा संकेत मानला जातो का? Kapal Kriya Ritual मागील आध्यात्मिक श्रद्धा, तांत्रिक गैरवापराशी संबंधित लोकमान्यता आणि विज्ञानाचे स्पष्टीकरण समजून घ्या. मृत व्यक्तीच्या भौतिक अस्तित्वाचा निरोप घेण्याशी या विधीचा काय संबंध आहे?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 08, 2026 | 08:34 PM
Hindu Cremation Rituals and Kapal Kriya Explained

Hindu Cremation Rituals and Kapal Kriya Explained

Follow Us
Follow Us:
  • चिता जळताना कवटीला तडे जाण्याची घटना कपालक्रियेशी जोडली जाते, पण प्रत्येक परंपरेत हा विधी सारखा नसतो.
  • हिंदू तत्त्वज्ञानातील पंचमहाभूतांची संकल्पना मृतदेहाच्या दहनाला आध्यात्मिक अर्थ देते आणि आत्म्याच्या प्रवासाची श्रद्धा स्पष्ट करते.
  • कवटी फुटण्यामागे उष्णतेमुळे हाडांमध्ये होणारे बदल कारणीभूत असतात, पण आत्ममुक्तीचा वैज्ञानिक पुरावा नाही.

चिता दहनाच्या वेळेची ही संबंधित एक प्रथा अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण करत असेल. चिता दहनाच्या वेळी कवटी फुटण्याची किंवा कवटीला तडे जाण्याची वाट का पाहिली जाते? काही हिंदू अंत्यसंस्कार परंपरांमध्ये कपालक्रियेला आत्म्याच्या मुक्तीशी जोडले जाते. पण ही प्रथा नेमकी कशी सुरू झाली, तिच्यामागील आध्यात्मिक अर्थ काय आणि कवटी फुटण्याची घटना विज्ञान कशी समजावते, हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

रावण होता वैकुंठाचा द्वारपाल! भगवान विष्णूंच्या भेटीसाठी घेतला होता तीन वेळा असुरकुळात जन्म; जाणून घ्या ही पुराणकथा

कवटी फुटण्याची वाट का पाहिली जाते?

बऱ्याच स्थानिक अंतिम संस्कारांच्या परंपरांमध्ये दहानावेली देहाची कवटी फुटण्याची वात पहिली जाते. शिवाय काही ठिकाणी त्यासाठी विधीही केला जातो ज्याला कपालक्रिया असेही म्हणले जाते.धार्मिक दृष्टीने मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले मानले जाते. मृत्यूनंतर शरीर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या तत्त्वांमध्ये विलीन होते, अशी हिंदू तत्त्वज्ञानातील संकल्पना आहे. कपालक्रिया ही देहाचा नश्वरपणा आणि आत्म्याच्या पुढील प्रवासाचे प्रतीक मानली जाते.

कपालक्रिया म्हणजे काय?

कपालक्रिया या विधीला सरळ समजायला गेले तर ते असे कि. दहनाच्या वेळी मृतदेहावर तूप ओतून चितेला मुखाग्नी दिला जातो. चिता जळते समयी शरीरावरील उती अर्थात त्वचा, अवयव, मांस हा  भाग लवकर जळतात, पण हाडे आणि मुख्यत्त्वे कवटीचे हाड लवकर जळत नाही. हिंदू समाजातल्या बऱ्याच अंतिम संस्कारांमध्ये चिता दहनानंतर कवटीला लाकडाच्या काठीच्या सहाय्याने तोडले किंवा फोडले जाते.

कृष्णाचे सुदर्शन चक्र, महादेवाचे त्रिशूळ, इंद्राचे वज्र कोणी तयार केले? जाणून घ्या देवतांच्या अस्त्रांमागील महान शिल्पकाराचे कार्य

अशी मान्यता आहे कि कपाळ किंवा कपाल हे देहामधून जाणाऱ्या आत्म्याचे मोक्ष मार्गासाठी अंतिम चरण असते. मान्यतेनुसार कपाल किंवा कवटी ज्यात मेंदू म्हणजे चेतनेचे मुख्य अस्तित्त्व असते, ज्याला प्राण म्हणूनही संबोधले जाते, त्या प्राणाला मुक्त करण्यासाठी ही कपालक्रिया केली जाते.प्राचीन काळात कवटी दाह संस्कारात अखंडित राहिली तर त्याला ‘अपूर्ण दाह’ असे संबोधले जायचे.

मृत व्यक्तीच्या आत्म्याला देहबंधनातून मुक्त होण्यासाठी कपालक्रिया केली जाते. काही ठिकाणी हा विधी मृत व्यक्तीचा पुत्र किंवा अंत्यसंस्काराची जबाबदारी घेणारी व्यक्ती करते. पण ही प्रथा सर्व हिंदू समाजांमध्ये सारखी नाही.

अजून काही मान्यतेनुसार, न जळलेल्या अखंड कवटीचा वापर तांत्रिक चुकीच्या तंत्रकांड साठी वापरू नयेत यासाठी ही क्रिया केली जाते, असे सांगितले जाते. याशिवाय, जोपर्यंत मृतदेह संपूर्ण राखेत बदलत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच्या देहाशी असलेली शोक भावना, प्रेमभावना नात्याची ओढ संपुष्टात येऊ शकत नाही असेही मानके जाते. कपालक्रियेची प्रथा ही त्या व्यक्तीच्या भौतिक अस्तीत्वाची संपुष्टी दर्शवतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चिता जळताना कवटी फुटण्याची वाट का पाहिली जाते?

    Ans: काही स्थानिक धार्मिक परंपरांमध्ये कवटीला तडे जाण्याच्या घटनेला कपालक्रियेशी जोडले जाते. पण सर्व हिंदू अंत्यसंस्कारांमध्ये कवटी फुटण्याची वाट पाहिली जातेच असे नाही.

  • Que: कपालक्रिया केल्याने आत्म्याला मुक्ती मिळते का?

    Ans: काही धार्मिक श्रद्धांनुसार कपालक्रिया आत्ममुक्तीशी संबंधित आहे. पण आत्म्याच्या मुक्तीचा दावा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला नाही.

  • Que: कवटी चितेच्या आगीत का फुटते?

    Ans: चितेतील तीव्र उष्णतेमुळे कवटीच्या हाडांमध्ये आकुंचन, ताण आणि भौतिक बदल होतात. त्यामुळे हाडांना तडे जाणे किंवा त्यांचे तुकडे होणे शक्य असते.

Web Title: Cremation skull cracking mystery kapal kriya religious spiritual history auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 08:34 PM

Topics:  

  • Religion

संबंधित बातम्या

Parijat Tree Story: सत्यभामेच्या हट्टामुळे श्रीकृष्णांनी स्वर्गातून आणला पारिजातक वृक्ष; जाणून घ्या या वृक्षामागील कथा
1

Parijat Tree Story: सत्यभामेच्या हट्टामुळे श्रीकृष्णांनी स्वर्गातून आणला पारिजातक वृक्ष; जाणून घ्या या वृक्षामागील कथा

Chiplaya: चिपळ्या हे केवळ वाद्य नाही, तर भक्तीचे प्रतीक! जाणून घ्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व
2

Chiplaya: चिपळ्या हे केवळ वाद्य नाही, तर भक्तीचे प्रतीक! जाणून घ्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व

9 Kitchen Spices: हळद ते मिरी… स्वयंपाकघरातील हे 9 मसाले बदलू शकतात ग्रहांची चाल? जाणून घ्या ज्योतिषीय महत्त्व
3

9 Kitchen Spices: हळद ते मिरी… स्वयंपाकघरातील हे 9 मसाले बदलू शकतात ग्रहांची चाल? जाणून घ्या ज्योतिषीय महत्त्व

Shiv Tandav Stotram: रावणाच्या वेदनेतून साकारले शिव तांडव स्तोत्र; जाणून घ्या कैलास पर्वताशी जोडलेली कथा
4

Shiv Tandav Stotram: रावणाच्या वेदनेतून साकारले शिव तांडव स्तोत्र; जाणून घ्या कैलास पर्वताशी जोडलेली कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.