Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nag Panchami: नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर या वस्तू अर्पण केल्याने होईल आर्थिक लाभ

यावेळी नागपंचमीचा सण 29 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि धनप्राप्ती होते, अशी मान्यता आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 27, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने पूजा केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला आशीर्वाद देतात, अशी मान्यता आहे. या दिवशी नागाची आणि महादेवाची पूजा केल्याने कालसर्प दोष दूर होतो, अशी देखील मान्यता आहे. आर्थिक लाभासाठी नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात, जाणून घ्या

कधी आहे नागपंचमी

पंचांगानुसार नागपंचमी दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते. यावेळी पंचमीची सुरुवात सोमवार, 28 जुलै रोजी रात्री 11.24 वाजता होणार आहे आणि पंचमीची समाप्ती बुधवार, 30 जुलै रोजी पहाटे 12.46 वाजता होईल. त्यामुळे यावेळी नागपंचमीचा सण मंगळवार 29 जुलै रोजी सर्वत्र साजरा करण्यात येईल.

नागपंचमीच्या दिवशी आर्थिक लाभासाठी शिवलिंगावर या गोष्टी अर्पण करा

दही

असे मानले जाते की, नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर दही अर्पण केल्याने समृद्धी येते. दही अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, महादेवाच्या आशीर्वादाने पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते.

Nag Panchami: नागपंचमीच्या दिवशी दूध का उकळवू नये? यावेळी चुकूनही करु नका ‘ही’ काम

मध

महादेवांना मध खूप आवडते, असे म्हटले जाते. या दिवशी शिवलिंगावर मध अर्पण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते आणि कर्जाच्या समस्येपासूनही मुक्तता मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.

गंगाजल

धार्मिक मान्यतेनुसार महादेवांना गंगाजल अर्पण केल्याने व्यक्तीला मानसिक शांती मिळते. असे मानले जाते की, शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

काळे तीळ

नागपंचमीच्या दिवशी नागाची आणि महादेवाची पूजा करताना काळे तीळ अर्पण करावे. शास्त्रामध्ये म्हटल्यानुसार काळ्या तिळाला विशेष महत्त्व आहे. अशा वेळी नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवाला काळे तीळ अर्पण केल्याने आर्थिक प्रगतीसह जीवनातील अनेक अडथळे दूर होतात.

Vastu Tips: घरामध्ये या दिशेला लावा बांबूचे रोप, आर्थिक संकट होतील दूर आणि नशिबाची मिळेल साथ

गाईचे तूप

महादेवांना गाईचे तूप खूप आवडते. नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर गाईचे तूप अर्पण केल्याने आजारांपासून मुक्तता होते आणि आर्थिक प्रगती होण्यास मदत होते. धार्मिक श्रद्धेनुसार असे केल्याने तुमची कर्जातून मुक्तता होते.

उसाचा रस

नाग पंचमीच्या दिवशी शिवलिंगाला उसाचा रस अर्पण करणे अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानले जाते. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Nag panchami 2025 offering these items on shivlinga will bring financial benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • Nag Panchami 2025
  • religions

संबंधित बातम्या

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
1

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम
2

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी
3

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Ketu Transit: ३ ऑक्टोबरला केतू बदलणार नक्षत्र, मिथुन तूळ राशीसह या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.