फोटो सौजन्य- pinterest
यंदा नागपंचमी मंगळवार, 29 जुलै रोजी आहे. यावेळी दूध उकळू नये आणि भाकरीही बनवू नये, अशी मान्यता आहे. नागपंचमीच्या दिवशी काय करावे काय करु नये, जाणून घ्या
यंदा नागपंचमी मंगळवार, 29 जुलै रोजी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी लोक सापांना दूध अर्पण करतात. नागपंचमीच्या निमित्ताने भगवान शिव आणि त्यांच्या गण वासुकी, सापांचा राजा यांची पूजा केल्याने कालसर्प दोष दूर होतो, असे मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टी करणे निषिद्ध मानले जाते. यामुळे पाप घडते अशी मान्यता आहे.
मान्यतेनुसार, नागपंचमीनुसार, दूध उकळवू नये. कारण या दिवशी सापाला दूध अर्पण केले जाते. असे मानले जाते की, या दिवशी दूध उकळल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे पाप लागू शकते.
नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदणे निषिद्ध मानले जाते. असे मानले जाते की, साप जमिनीतील बिळांमध्ये राहतात. त्यामुळे ती खोदल्याने त्यांचे अधिवास नष्ट होतात.
नागपंचमीच्या दिवशी चपाती किंवा भाकरी बनवू नये. तव्याला अग्नितत्त्वाचे प्रतीक मानले जाते. सापांना अग्नीची भीती वाटते. राजा जन्मेजयने आपल्या वडिलांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी यज्ञ केला. धार्मिक मान्यतेनुसार, तवा हा सापाचा फणा मानला जातो, म्हणून या दिवशी तवा चुलीवर ठेवला जात नाही.
नागपंचमीच्या पूजेवेळी लोक घरामध्ये मूर्ती आणतात किंवा चित्र काढून त्याची पूजा करतात. त्यावेळी प्लास्टिकच्या मूर्तींचा वापर करू नये. या दिवशी माती किंवा दगडापासून बनवलेल्या सापाच्या मूर्तीची पूजा करावी. नागपंचमीला सोने आणि चांदीपासून बनवलेल्या सापांचीही पूजा केली जाते.
नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी. तसेच कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी.
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असल्यास नागपंचमीच्या दिवशी महादेवाची पूजा करावी. त्यामुळे कालसर्प दोष दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे या दिवशी सोन किंवा चांदीचे नाग यांची पूजा केली जाते.
सुख आणि समृद्धीसाठी नागपंचमीला नाग देवतेच्या मंदिरात किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)