फोटो सौजन्य- istock
आपल्या जीवनामध्ये कोणतेही रोप ती जागा आकर्षक बनवत नाही तर तेथील वातावरण बदलण्यास सक्षम असलेल्या ऊर्जावान शक्तीगृहासारखे काम करतात. योग्य वास्तू स्थानाचे पालन केल्यास आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात.
वास्तूशास्त्र आणि फेंगशुईनुसार बांबूची रोप घरात लावणे शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, जर तुम्ही बांबूची रोपे योग्य दिशेने ठेवल्यास ते आपल्या जीवनासाठी फायदेशीर मानले जाते. तसेच ते जीवनातील उपचार आणि वाढीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. त्याचप्रमाणे पृथ्वी, अग्नि, हवा, पाणी आणि लाकूड या पाच घटकांचे बांबूचे रोप प्रतिनिधित्व करते असे देखील म्हटले जाते. स्वयंपाकघरात बांबूचे रोप ठेवल्याने घरामधील संपत्तीत वाढ होते, अशी मान्यता आहे.
दक्षिण-पूर्व दिशा म्हणजेच आग्नेय दिशा. ही दिशा तुमच्या जीवनामध्ये धनाचा मार्ग दर्शविणारी दिशा मानली जाते. धनाचा सतत प्रवाह राहण्यासाठी या दिशेला बांबूचे रोप ठेवणे सर्वोत्तम मानले जाते. त्याचे आकर्षण वाढवण्यासाठी या रोपाला हिरव्या, पिवळ्या किंवा सोनेरी रंगाच्या भांड्यात ठेवा. त्याच्याभोवती लाल रिबन बांधा. बांबूमध्ये न तुटता वाकण्याची क्षमता असते. तसेच बांबूच्या रोपाला ताकदीचे प्रतीक देखील मानले जाते.
आग्नेय दिशेसोबतच बांबूचे रोप ठेवण्यासाठी पूर्व दिशा देखील सर्वोत्तम मानली जाते. कारण ही जागा सकारात्मक उर्जेचे प्रतिनिधित्व करत असल्याचे म्हटले जाते. बांबूचे पोकळ खोड मोकळेपणा आणि संवादाचे प्रतीक आहे, ज्यामुळे उर्जेचा मुक्त प्रवाह होतो आणि सकारात्मकतेला प्रोत्साहन मिळते.
उत्तर दिशेला वाढ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की, या दिशेला बांबूची रोपे लावल्याने जलद वाढ जीवनातील ऊर्ध्वगामी गती आणि यशाशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. तसेच संपत्ती, शांती आणि आनंद देखील आकर्षित करते. हे रोप घर किंवा ऑफिसमध्ये उत्तर दिशेला लावल्याने करिअरमध्ये वाढ होते आणि अपेक्षित यश मिळते.
उत्तर-पूर्व दिशा म्हणजे ईशान्य दिशा. ही दिशा आरोग्याचे प्रतिनिधित्व करते. या दिशेला रोप लावल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते, अशी मान्यता आहे. बांबूचे रोप लावताना एका काचेच्या पात्रात लहान पांढरे खडे आणि पाण्याने ठेवा जेणेकरून त्याची शांत ऊर्जा वाढेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)