
फोटो सौजन्य- chatgpt
शंकराचा आवडता महिना श्रावण या महिन्याची सुरुवात १३ ऑगस्टपासून होत आहे आणि या महिन्याची समाप्ती ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. यावेळी चार श्रावणी सोमवार येणार आहेत. श्रावण महिन्याला सणांचा राजा आणि पवित्र मानले जाते. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि पोळा हे प्रमुख सण साजरे केले जातात. तसेच या काळामध्ये येणाऱ्या श्रावणी सोमवार, मंगळागौरीचे व्रत या सणांमुळे संपूर्ण महिना भक्तिमय आणि उत्साही होतो.
नागपंचमी सोमवार, १७ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. पंचमी तिथीची सुरुवात १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:५२ वाजता सुरू होणार आहे आणि १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पंचमी तिथीची समाप्ती होणार आहे. उद्यतिथीनुसार नागपंचमीचा सण सोमवार, १७ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. नागपंचमीच्या दिवशी सोमवार असणे हा एक अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ योगायोग मानला जातो. श्रावण महिना आणि सोमवार भगवान शिवाला समर्पित आहेत, आणि नाग हे शिवाच्या गळ्यात असल्यामुळे या दिवशी केलेली पूजा खूप फलदायी ठरते.
महाराष्ट्रातील काही भागामध्ये नागपंचमीच्या दिवशी भिंतीवर किंवा पाटावर नागाची प्रतिमा काढून पूजा करण्याची पद्धत आहे. परंपरेनुसार नागदेवतेला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. महिलांकडून नागदेवतेची पूजा करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी नागाला ईजा होऊ नये म्हणून शेतकरी शेतात नांगर फिरवत नाही. या दिवशी विळी देखील वापरली जात नाही. मात्र जिवंत सापांना पकडून त्यांना दूध पाजणं किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे त्रासदायक विधी करणं योग्य नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार, नागपंचमीला भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केल्याने आणि योग्य विधींनी सर्पदेवाची पूजा केल्याने राहू-केतू दोषांचा प्रभाव कमी होतो, असे मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष, नाग दोष किंवा राहू-केतू संबंधित समस्या आहेत, ते या दिवशी विशेष प्रार्थना करतात आणि मंत्रांचा जप करतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: नागपंचमी सोमवार, 17 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे
Ans: हिंदू परंपरेत नागदेवतांना श्रद्धेने पूजले जाते. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन करून संरक्षण, सुख-समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्याची परंपरा आहे.
Ans: नागपंचमी हा श्रावणातील महत्त्वाचा सण असून नागदेवतेप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचा आणि निसर्गातील सजीवांविषयी आदर राखण्याचा दिवस मानला जातो.