
फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार न्यायाधीश ग्रह शनि आणि ग्रहांचा राजकुमार बुध एकत्रितपणे नवपंचम राजयोग तयार करत आहे. हा योग रविवार 26 ऑक्टोबर रोजी पहाटे 2.44 वाजता तयार होईल. यावेळी बुध आणि शनि एकमेकांपासून 120 अंशांवर असतील. यावेळी सर्व राशीच्या लोकांवर विविधप्रकारे प्रभाव पडेल. या शुभ योगाचा काही राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडेल. या राशींच्या लोकांना ज्ञान, समृद्धी आणि अपार यश मिळेल. नवपंचम योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवपंचम योग खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात भरभराट होईल आणि आत्मविश्वासही वाढेल. या काळामध्ये तुम्ही गाडी किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. या काळात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल आणि तुम्ही परदेश प्रवास देखील करु शकतात.
नवपंचम योग हा मकर राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल आणि पैसे कमविण्याच्या संधी मिळतील. त्यासोबतच या काळात व्यवसाय आणि नोकरीमध्ये देखील तुमची प्रगती होईल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे चांगले संबंध निर्माण होतील. जर तुम्ही एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत असाल तर त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ खूप अनुकूल आहे. या काळात तुमच्यावर अनेक जबाबदारी येऊ शकते.
कुंभ राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनि यांचा नवपंचम योग खूप शुभ असणार आहे. या योगामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी नवपंचम योग शुभ राहणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत अपेक्षित यश देखील मिळेल.
मीन राशीच्या लोकांना नवपंचम योगाचा खूप फायदा होणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. उच्च शिक्षण, संशोधन किंवा विशेष क्षेत्रात गुंतलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. परदेश प्रवास, व्हिसा मंजुरी किंवा शिष्यवृत्तीशी संबंधित लोकांना सकारात्मक निर्णय ऐकायला मिळतील. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहे किंवा नवीन पदावर प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना महत्त्वाच्या संधी मिळू शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)