
फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येकाला आशा असते की नवीन वर्ष त्यांच्यासाठी खास असेल. प्रत्येकाला नवीन वर्षाची सुरुवात एका खास पद्धतीने करायची असते. श्रद्धेनुसार, वर्षाच्या पहिल्या दिवसाचा संपूर्ण वर्षावर प्रभाव पडतो. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लोक घरी पूजा करतात, मंत्र जप करतात आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. यावेळी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही विशेष कामेदेखील केली जातात. तसेच संकल्प केले जातात. त्यामुळे देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद राहतो. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणते संकल्प आणि कामे करावीत जाणून घ्या
धार्मिक श्रद्धेनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून आंघोळ करावी. त्यानंतर सूर्य देवाची प्रार्थना करावी. यासाठी 2026 च्या पहिल्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठावे नंतर पाण्यात गंगाजल मिसळून आंघोळ करावी. सूर्य देवाला प्रार्थना करावी. ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. असे केल्याने दिवसाची सुरुवात सकारात्मक होते.
प्रत्येक वर्षाच्या पहिल्या दिवशी घराची साफसफाई केली जाते. त्यामुळे 2026 च्या पहिल्या दिवशी घर स्वच्छ करावे. असे मानले जाते की, घर स्वच्छ केल्याने देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीची पूजा नक्की करा. सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा आणि मला लाल रंगाचा कलवा बांधा. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा आणि भगवान विष्णूच्या मंत्र्याच्या करावा. यामुळे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरामध्ये धन वैभव वाढते
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवी देवतांचे आशीर्वाद घेतल्यावर घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. असे म्हटले जाते की, ज्या ठिकाणी मोठे आनंदित राहतात त्या ठिकाणी आपोआप सुख समृद्धी येते.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरामध्ये गोड वस्तू बनवा. सर्वात पहिले हा नैवेद्य घरातील देवांना दाखवावा. त्यानंतर हा नैवेद्य कन्यांना वाटावा. असे केल्याने देवी लक्ष्मीची त्यांच्यावर विशेष कृपा राहते.
नवीन वर्षात मोठ्यांचा आदर करेल हा संकल्प करा. कर्ज घेणार नाही आणि दान पुण्य करेन, मद्यपान करणार नाही. ज्यामुळे पूर्ण वर्षभर घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: नववर्षाच्या पहिल्या दिवशी सत्य, संयम, स्वच्छता, दानधर्म आणि सकारात्मक विचारांचे संकल्प करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे वर्षभर सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
Ans: नियमित पूजा, घर स्वच्छ ठेवणे, अनावश्यक खर्च टाळणे आणि गरजूंना मदत करण्याचा संकल्प केल्यास लक्ष्मीदेवीची कृपा मिळते, असे धार्मिक मानले जाते.
Ans: पहिल्याच दिवशी वाद, उधारी देणे, नकारात्मक बोलणे आणि घर अस्वच्छ ठेवणे टाळावे. याचा वर्षभर नकारात्मक परिणाम होतो, असे मानले जाते.