फोटो सौजन्य- pinterest
नवीन वर्ष 2026 ची सुरुवात ज्योतिषशास्त्रानुसार शुभ योगाने होणार आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी रोजी शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आणि मृगशिरा नक्षत्र सोबतच रवि योग तयार होत आहे. यावेळी नवीन कामाची सुरुवात, गुंतवणूक, प्रवास, शिक्षण शिव व्यावसायानिमित्त प्रवास करणे खूप फायदेशीर राहील. अशावेळी शुभ योगाच्या प्रभावामुळे फायदेशीर आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेली राहील.
यानंतर 2 जानेवारी रोजी गुरु आणि चंद्र यांच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होईल. ज्यामुळे आर्थिक, सन्मान, ज्ञान आणि सुख देणारा राहील. याचा फायदा विशेषत: कर्क, वृश्चिक आणि मीन या राशींच्या लोकांसाठी योग खूप फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय जानेवारीमध्ये पाच ग्रहांच्या युतीमुळे पंचग्रही योग तयार होत आहे. जे जीवनामध्ये यश आणि समृद्धी आणते.
मेष राशींच्या लोकांना पंचग्रही योग फायदेशीर जाणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला राहील.
शुक्रादित्य राजयोग मिथुन राशींच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. तसेच तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. वाहन किंवा मालमत्तेची खरेदी करू शकता. बेरोजगारांना नवीन संधी मिळेल. मानसिक शांती मिळेल.
रवि योग कर्क राशींच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक राहील. यावेळी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल आणि नशिबाची साथ मिळेल. दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक ला होण्याची शक्यता. करिअर करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळेल.
बुधादित्य राजयोग कन्या राशींच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. भागीदारी मध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. नवीन उपक्रमांची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील.
गजकेसरी योगामुळे धनु राशींच्या लोकांना फायदा होईल. वैवाहिक जीवनासाठी हा काळ चांगला राहील. दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. या काळात मागील गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. सामाजिक प्रतिष्ठान, मान सन्मान वाढेल.
मालव्य राजयोगाचा फायदा मकर राशींच्या लोकांना सर्वात जास्त होणार आहे. या काळात व्यवसायात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना बढतु आणि पदोन्नती मिळू शकते. भावंडांकडून पाठिंबा मिळेल. दीर्घकालीन समस्या दूर होतील
चतुर्ग्रही योग कुंभ राशींच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक राहील. यावेळी उत्पन्नाचे स्त्रोत वाढू शकतात. या काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. यावेळी प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल होताना दिसून येतील. आदरणीय सन्मान मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: नवीन वर्षात पंचग्रही योग तयार होत आहे. याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे
Ans: अशा प्रकारची ग्रहयुती आणि ग्रहदृष्टी खूप दीर्घ कालावधीनंतर जुळून येते. त्यामुळे या योगाचा प्रभाव सामान्य योगांपेक्षा अधिक शक्तिशाली मानला जातो.
Ans: नवीन वर्षात रवि योग, गजकेसरी योग, चतुर्ग्रही योग, मालव्य राजयोग, बुधादित्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग, आदित्य मंगल राजयोग, लक्ष्मी नारायण राजयोग






