फोटो सौजन्य- pinterest
पंचांगानुसार गुरुवार 1 जानेवारी रोजी गुरु प्रदोष व्रत आहे. गुरुवारी हे व्रत येत असल्याने त्याला गुरू प्रदोष व्रत म्हटले जाते. हे व्रत महादेवांना समर्पित आहे. या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. सोबतच चांगला वर मिळण्यासाठी प्रार्थना केली जाते.
ज्योतिषशास्त्रात नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश आणि संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी काही विशेष उपाय करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हालाही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महादेवांना प्रसन्न करायचे असेल तर पूजेच्या वेळी हे उपाय करा. हे उपाय केल्याने ग्रहाची स्थिती देखील सुधारते. प्रदोष व्रताच्या दिवशी कोणते उपाय करायचे जाणून घ्या
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुरू प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी स्नान ध्यान झाल्यानंतर गंगाजलाने महादेवांना अभिषेक करावा. तुम्हाला हवे असल्यास गंगाजलांमध्ये काळे तिळ मिसळून अभिषेक करू शकता. हा उपाय केल्याने ग्रहाची असलेली कमकुवत स्थिती सुधारते.
जर तुम्हाला घराची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीच्या रोपाची पूजा करावी. स्नान आणि ध्यान झाल्यानंतर गंगाजलात कानेरची फुले मिसळून ती तुळशीला अर्पण करावी. या विधीमुळे विश्वाचे रक्षक भगवान विष्णू प्रसन्न होतात. त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंद आणि शांती येते.
जर तुम्हाला मानसिक ताण कमी करायचा असल्यास गुरु प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करताना महादेवांना कच्च्या गाईच्या दुधाने अभिषेक करा. हा उपाय तुमच्या कुंडलीतील चंद्राला बळकटी देतो. चंद्र देवाच्या आशीर्वादाने मानसिक ताणाची समस्या दूर होण्यास मदत होते.
जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रहाची स्थिती बळकट असेल नवीन वर्षाच्या पहिस आणि प्रदोष व्रताची पूजा केल्यानंतर पिवळ्या वस्तूचे दान करा. यामुळे व्यक्तीवर गुरु देवाचे आशीर्वाद राहतात. त्यांच्या कृपेने नोकरी आणि व्यवसायात इच्छित यश मिळतात.
देवांचे देव भगवान शिव यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरु प्रदोष व्रताच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करा आणि शिव तांडव स्तोत्राचा पाठ करा. शिव तांडव स्तोत्राचे पठण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांवर त्यांचे आशीर्वाद वर्षाव होतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: प्रदोष व्रत भगवान शंकरांना समर्पित आहे. प्रत्येक त्रयोदशीच्या दिवशी सूर्यास्ताच्या सुमारास हे व्रत केले जाते.
Ans: वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रदोष व्रत केल्यास संपूर्ण वर्षभर महादेवांची कृपा राहते आणि अडचणी दूर होण्यास मदत होते.
Ans: हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आरोग्य, करिअर, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांती लाभते.






