काय आहे नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी
नॉस्ट्रॅडॅमस हा सहव्या शतकातील अत्यंत प्रसिद्ध ज्योतिषी आणि अभ्यासक मानला जातो. त्याने नमूद केलेले 9/11 हल्ला आणि अन्य बऱ्याच गोष्टींचे भाकीत खरे ठरल्याचे सांगण्यात येते. आता त्यांच्या अंदाजांवर आधारित, 2025 बद्दल चर्चा आहे की हे वर्ष काही राशींसाठी खूप फायदेशीर असेल आणि या राशीच्या व्यक्ती करोडपती होण्याची शक्यता आहे. या 6 राशींसाठी काय खास असेल ते जाणून घेऊया. नॉस्ट्रॅडॅमसने या नव्या वर्षासाठी कोणत्या राशीचे नशीब पालटणार आहे याचे भाकित केले आहे ते आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
मेष राशीसाठी उत्तम
मेष राशीच्या व्यक्तींसाठी ठरेल वर्ष चांगले
मेष राशीच्या लोकांसाठी 2025 खूप शुभ राहील. मेष राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती मजबूत राहणार असून तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. याशिवाय तुमच्या इच्छा हळूहळू पूर्ण होतील आणि तुम्हाला नवीन कामात यश मिळेल. येणारे नववर्ष हे तुम्हाला आनंदाचा काळ घेऊन येणार आहे आणि हे वर्ष तुम्हाला लक्षाधीश बनवू शकते असे भाकित वर्तविण्यात येत आहे
2025 मध्ये शुक्र-शनिसह 4 ग्रह चालणार उलटे, या राशींसाठी ठरणार राजयोग ‘सुवर्णकाळ’
वृषभ राशीसाठी लाभदायक
वृषभ राशीसाठी नववर्षाचे भाकीत
वृषभ राशीच्या लोकांना स्थिरता आणि सौंदर्य आवडते. या राशीच्या व्यक्तींना नव्या वर्षात गुंतवणुकीचे फायदे मिळणार आहेत आणि तुम्ही हुशारीने गुंतवणूक कराल, ज्यामुळे भरपूर नफा मिळेल. याशिवाय तुम्हाला आर्थिक यश प्राप्त होऊन तुमची चिकाटी आणि कठोर परिश्रम दीर्घकालीन आर्थिक स्थिरता प्रदान करतील. तसंच वृषभ राशीच्या व्यक्ती श्रीमंत होण्याची शक्यता आहे, नवीन वर्षात तुमच्यासाठी आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे
सिंह राशीसाठी खास
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी नवे वर्ष
सिंह राशीसाठीदेखील 2025 खूप शुभ असेल. सिंह राशीच्या व्यक्तींना आर्थिक सुबत्ता येणार असून पैशाची कमतरता भासणार नाही आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. याशिवाय सिंह राशीच्या व्यक्तींना नवीन संधी प्राप्त होतील आणि तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता, जो यशस्वी होईल. तसंच सिंह राशीच्या नशिबात परदेश प्रवास असून परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे
कन्या राशीसाठी भरभराट
कन्या राशीसाठी नवे वर्ष कसे जाईल
कन्या राशीचे लोक विचारपूर्वक निर्णय घेतात. त्यामुळे त्यांना गुंतवणुकीचा फायदा मिळणार आहे. तुम्ही वेगवेगळ्या स्त्रोतांमध्ये गुंतवणूक कराल, ज्यामुळे आर्थिक फायदा होईल. याशिवाय तुमचे कुटुंब आनंदी राहील आणि खर्चाच्या तुलनेत उत्पन्न वाढेल. मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता असून घर किंवा इतर वस्तू खरेदी करण्याचा अंदाज आहे. तरुणांसाठी संधी चालून येणार असून चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळण्याची शक्यता आहे
वृश्चिक राशीचे नशीब फळफळणार
वृश्चिक राशीचे नववर्षातील नशीब
वृश्चिक राशीचे लोक मेहनती आणि रणनीतीकार मानले जातात. नव्यावर्षात वृश्चिक राशीच्या व्यक्तींना धन लाभ होणार आहे आणि कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक केल्याने तुम्हाला मोठे फायदे मिळतील. याशिवाय न्यायिक यश प्राप्त होईल आणि जुन्या न्यायालयीन खटल्यांमध्ये तुमच्या बाजूने निर्णय होऊ शकतो. तसंच वृश्चिक राशीच्या व्यक्तींना व्यवसायात नफा मिळणार असून नवीन व्यवसाय सुरू केल्याने मोठे आर्थिक यश मिळेल
Sankashti Chaturthi 2024: वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी, बुधवारचा संयोग; गणेशाची होणार कृपा
मकर राशीसाठीही उपयुक्त
मकर राशीसाठी नवे वर्ष
मकर राशीचे लोक मेहनती आणि प्रामाणिक असतात. शनीचा प्रभाव यार्षी राहणार असून 2025 मध्ये शनीच्या मजबूत स्थितीचा तुम्हाला फायदा होईल. व्यावसायिक वाढ होऊन कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि वागणूक पाहून लोक प्रभावित होतील. तुम्हाला नवीन जबाबदारी, उच्च पद आणि मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
या 6 राशींसाठी 2025 खूप शुभ असणार आहे. आर्थिक प्रगती, नवीन संधी आणि जीवनात आनंदाचे संकेत आहेत. नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार, हे वर्ष यश आणि समृद्धीचे प्रतीक असेल.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.