ग्रह गोचरचा पुढच्या वर्षी कोणत्या राशीवर परिणाम होणार
ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह नियमितपणे भ्रमण करत असतात. काही वेळा ते वक्री होतात आणि आणि काही वेळा मार्गी होत असतात. ग्रहांचे हे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करते. 2025 मध्ये बुध, गुरू, शुक्र आणि शनि असे चार शक्तिशाली ग्रह उलटे फिरणार आहेत. त्यांच्या या उलटसुलट चालीमुळे 3 राशींचा सुवर्ण टप्पा सुरू होणार आहे, ज्याच्या प्रभावाने ते पुढील वर्षभरात राजासारखे जीवन जगतील.
ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत, ज्यांचा सुवर्णकाळ लवकरच सुरु होणार आहे (फोटो सौजन्य – iStock)
गोचर शब्दाचा अर्थ
गोचर हा शब्द ‘गम’ या मूळापासून बनला आहे ज्याचा अर्थ ‘चालणे’ आहे. चार या शब्दाचा अर्थ ‘गतिशील असणे’ असा होतो. म्हणून गोचरचा अर्थ ‘सतत हालचाल’ असा आहे. विश्वातील सर्व ग्रह आपल्या अक्षावर फिरतात आणि कालांतराने त्यांचा वेग बदलतात. एका राशीतून दुस-या राशीत ग्रहांच्या बदलाला संक्रमण म्हणतात. ग्रहांच्या संक्रमणाचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो.
मार्गी आणि वक्री म्हणजे काय?
ग्रह मार्गी होतो आहे याचा अर्थ तो त्याच्या सरळमार्गी गतीमध्ये फिरत आहे. त्याच वेळी, जर एखादा ग्रह विरुद्ध दिशेने जात असेल तर त्याला वक्री संक्रमण म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्र वगळता सर्व ग्रह वक्री मार्गक्रमण करतात. परंतु राहु आणि केतू हे नेहमी वक्री चालीनेच संक्रमण करतात
कर्क रास
कर्क राशीचा उदय
चार शक्तिशाली ग्रहांच्या वक्री गतीमुळे कर्क राशीच्या लोकांना व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि खेळात रुची वाढेल. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी पुढील वर्ष हे लाभदायक असणार आहे
वृश्चिक रास
वृश्चिक राशीचा पुढच्या वर्षाची आनंदी सुरूवात
वृश्चिक राशीच्या लोकांनाही पुढील वर्षी नफा होणार आहे. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अचानक सुधारेल. तुमच्या घरात काही वाहन किंवा मालमत्ता येण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
Sankashti Chaturthi 2024: वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी, बुधवारचा संयोग; गणेशाची होणार कृपा
मकर रास
मकर राशीच्या व्यक्तींसाठी आनंदी वर्ष
नवीन वर्षात ग्रहांची उलटी हालचाल तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन येत आहे. या काळात बेरोजगारांना नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत. पुढील वर्षी त्यांच्यासाठी चांगल्या संधी असतील. तुम्ही घर किंवा दुकान खरेदी करू शकता. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.