फोटो सौजन्य- istock
आज बुधवार, 25 जून. केतू हा मूलांक 7 या अंकाचा स्वामी ग्रह आहे. आज केतूचा प्रभाव सर्व मूलांकांच्या लोकांवर दिसून येईल. बुधाची संख्या 5 मानली जाते. मूलांक 5 असलेले लोक कामाच्या ठिकाणी व्यस्त राहतील आणि या लोकांना कामानिमित्त बाहेर देखील जावे लागू शकते. मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या.
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व क्षमतेचे कौतुक देखील केले जाऊ शकते.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमचा कोणत्याही व्यक्तीशी मतभेद असतील तर ते दूर होतील. मानसिक ताण कमी होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही वादात पडणे तुम्हाला टाळावे लागेल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला एखाद्या अडचणींचा सामना करावा लागेल. मानसिक ताणतणाव वाढू शकतो. कठोर मेहनत घेतल्यास तुम्हाला त्यात यश मिळेल.
मूलांक 5 असणारे लोक कामाच्या ठिकाणी व्यस्त राहू शकतात. व्यवसायामध्ये काही नवीन योजना आखू शकतात ज्यांचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तुमची एखाद्या जुन्या मित्रांची भेट होऊ शकते.
मूलांक 6 असलेले लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. हे लोक कुटुंबासोबत वेळ घालवू शकतात. तुमचा मानसिक ताण कमी होऊ शकतो. तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. हे लोक एखाद्या विषयावर खोलवर विचार करु शकतात. एखाद्या जुन्या मित्राती भेट होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयार करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल.
मूलांक 8 असलेले लोक कामाच्या ठिकाणी व्यस्त राहू शकतात. आज या लोकांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागू शकते. आर्थिक फायदा होईल. वरिष्ठ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळू शकते.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करु नका अन्यथा नुकसान होऊ शकते. काही वेळा तुम्हाला संघर्षाचा देखील सामना करावा लागू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)