फोटो सौजन्य-istock
आज शुक्रवार असल्याने आजचा अधिपती ग्रह शुक्र आहे. शुक्राची संख्या 6 मानली जाते. यामुळे मूलांक 4 असलेले लोक कामाच्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन त्यांना येणाऱ्या समस्येवर उपाय शोधतील. तर मूलांक 6 असलेल्या लोकांच्या नातेसंबंधामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव असेल तर तो दूर होईल. मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या.
मूलांक 1 असलेले लोक कोणतेही काम आज आत्मविश्वासाने पूर्ण करतील. या लोकांनी इतरांकडून जास्त अपेक्षा करण्याचे टाळावे. तुम्ही कोणतेही काम करताना विचारपूर्वक करा.
मूलांक 2 असलेल्या लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना निर्माण होतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तुमची एखाद्या जुन्या मित्रांची भेट होईल. तुमचा मानसिक ताण कमी होईल.
कामाच्या ठिकाणी कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. तुम्हाला कोणत्याही वादापासून लांब राहावे लागेल. आज तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेऊ शकता. तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाईल.
मूलांक 4 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी व्यवस्थितरित्या करावे लागेल. आज या लोकांनी वेळेचा योग्य वापरण करणे गरजेचे आहे. जर तुमचे कोणते काम अडकलेले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकेल.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस संघर्षाचा असू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचा आजचा दिवस व्यस्त राहील. कामानिमित्त तुम्ही आज प्रवास करु शकता. कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही जोडीदारासोबत वेळ घालवू शकता. तुम्हाला कोणताही तणाव असेल तो आज संपून जाईल.
मूलांक 7 असलेले लोक स्वतःबद्दल खोलवर विचार करतील. या लोकांना व्यवसायासाठी आजचा दिवस शुभ आहे. व्यवसायानिमित्त या लोकांना बाहेर जावे लागू शकते.
मूलांक 8 असलेल्या लोकांवर अनेक जबाबदाऱ्या येऊ शकतात. तुम्हाला कोणतेही काम करताना हुशारीने करावे लागेल. तुमचे कोणतेही प्रलंबित कामे असतील तर ती आज पूर्ण होतील. कोणतीही दीर्घकालीन गुंतवणूक करत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल.
मूलांक 9 असलेले लोक सामार्जित कार्यात रस घेतील. तुम्ही इतरांना मदत करण्यास प्राधान्य द्याल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला हुशारीने काम करावे लागेल. तुम्ही आज कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)