फोटो सौजन्य- istock
आज गुरुवार, 3 जुलैचा दिवस आज गुरु ग्रहाचा प्रभाव सर्व मूलांकांच्या लोकांवर होताना दिसून येईल. आजचा दिवस मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी विशेष आणि फायदेशीर राहील. तसेच या लोकांच्या जीवनामध्ये शुभ योगायोग घडून येतील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी कोणतेही प्रयत्न कराल त्यामध्ये यश मिळेल. तसेच तुम्ही नेतृत्वाची भूमिका बजावू शकता. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नातेसंबंधामध्ये गोडवा राहील.istock
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस भावनांनी भरलेला राहील. तुम्ही ज्यामध्ये मेहनत घेत आहात त्यात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही कामात थोडा आळस दाखवू शकता. परंतु जे सर्जनशील क्षेत्राशी संबंधित आहेत ते प्रगती करतील. मानसिक शांती मिळेल.
मूलांक 3 असलेल्यांचा आजचा दिवस चांगला असेल. या लोकांना शिक्षण क्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळेल. वरिष्ठांचा सल्ला मिळेल. आर्थिक व्यवहारांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात गुंतवणूक करताना विचार करुन निर्णय घ्यावा अन्यथा नुकसान होऊ शकते.
मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांच्या कामामध्ये अडथळा येऊ शकतो. कामामध्ये तुम्हाला आज काही अडचणी येऊ शकतात. सामाजिक क्षेत्रामध्ये सहभागी व्हाल.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी कोणतेही निर्णय घेताना हुशारीने घ्या. कामानिमित्त तुम्ही बाहेर जाऊ शकता. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवू शकता. तसेच परिवारासोबत देखील चांगला वेळ घालवू शकता. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. मानसिक संतुलन राखण्यासाठी तुम्ही अध्यात्म, निसर्ग किंवा संगीताची मदत घेऊ शकता. कोणताही निर्णय घेताना घाई करु नका विचारपूर्वक घ्या
मूलांक 8 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी ताण येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी एखादी जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. शारीरिक थकवा टाळण्यासाठी थोडी विश्रांती घ्या.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करु शकता. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणताही निर्णय घेताना संयम बाळग
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)