फोटो सौजन्य- istock
अंकशास्त्रानुसार, मूलांक 8 असणाऱ्यांचा स्वामी ग्रह शनि आहे. सूर्याची संख्या 1 आहे. त्यामुळे मुलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल. तसेच मूलांक 8 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे कोणतेही काम करताना शांततेने करावे. मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांचा आजचा रविवारचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. या लोकांना त्यांच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. सूर्यदेवाच्या कृपेमुळे या लोकांना व्यवसायात फायदा होईल. व्यवसायाच्या संबंधित समस्या सुटतील. आज तुमच्या परिवारातील लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या
मूलांक 2 असलेले लोक कोणतेही नवीन काम सुरु करण्यासाठी त्यांना त्यांच्या परिवाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. या लोकांना व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. आज तुम्ही कुटुंबासोबत बाहेर जाण्याची योजना आखू शकतात.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. सरकारी कामात यश मिळेल. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात. सामाजिक कार्यामुळे तुमचे पद प्रतिष्ठा वाढेल.
मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आज वडिलांच्या तब्ब्येतीची काळजी घ्यावी लागेल. पैशांच्या संबंधित गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगावी अन्यथा तुम्हाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस खास असणार आहे. तुम्ही आज एखाद्या नवीन कामाची सुरुवात करु शकतात. तसेत काहींना नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर आजचा दिवस चांगला आहे. कुठेही पैशांची गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहणार आहे. कामाच्या ठिकाणी कोणत्याही भांडणापासून दूर राहा. घरातील सदस्यांसोबत वाद होण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. वडिलांच्या आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. आज तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो. तसेच तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मूलांक 8 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुमच्या कोणत्याही कामात आज अडथळे येऊ शकतात. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 9 असलेल्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. पैशाच्या संबंधित कोणत्याही समस्या असतील तर त्या आज सुटतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)