Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology Horoscope Today: राग आवरा, वाद टाळा! मूलांक 4 आणि 7 च्या व्यक्तींसाठी अंकशास्त्र काय सांगते?

Numerology Horoscope Today: मंगळवारी चंद्रघंटा देवीची पूजा आणि गजकेसरी योगाच्या पार्श्वभूमीवर सर्व नऊ मूलांकांच्या व्यक्तींसाठी दिवसाचे भाकीत देण्यात आले आहे. मूलांक 1 च्या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, तर मूलांक 2 ने अहंकार आणि राग टाळावा. मूलांक 3 ने उत्साहावर नियंत्रण ठेवून शांतपणे काम करावे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 13, 2026 | 10:50 AM
Numerology Horoscope Today (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Numerology Horoscope Today (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘या’ मुलांकने अनावश्यक खर्च टाळा आणि कामावर लक्ष केंद्रित करा.
  • ‘या’ मुलांकने अहंकार, राग आणि घरातील वादांवर नियंत्रण ठेवा.
  • ‘या’ मुलांकने अपूर्ण कामे पूर्ण करा आणि निर्णय घेताना संयम बाळगा.
मंगळवारी चंद्रघंटा देवीची पूजा आहे आणि सोबतच गजकेसरी योग पण जुळून येतोय. या योगाचा परिणाम सगळ्या मूलांकांवर होणार आहे. काहींसाठी दिवस चांगला जाणार आहे तर काहींना जरा जपून राहावे लागणार आहे. तुमचा मूलांक काय सांगतोय, चला एक एक करून बघूया.तुमचा मूलांक काढायचा असेल तर तुमच्या जन्म तारखेची बेरीज करा. जसे 23 तारीख असेल तर 2+3=5, तुमचा मूलांक 5 झाला. Numerology Horoscope Today:

मूलांक 1 – खर्चाला आवर घाला

आज तुमचा खर्च खूप वाढणार आहे. हात थोडा सैल सुटणार आहे. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होईल. जवळच्या माणसाचे एखादे वाक्य मनाला लागेल, पण ते मनात ठेवून काम बिघडवू नका. कामावर लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. कोणतेही मोठे काम अंगावर घेण्याआधी दहा वेळा विचार करा. घरातले वातावरण मात्र एकदम निवांत असणार आहे.

मूलांक 2 – अहंकार सोडा

आज दिवसभर धावपळ आणि मेहनत आहे. ऑफिसमध्ये किंवा घरात जर तुम्ही अहंकाराने किंवा रागाने वागत असाल तर ते लगेच बंद करा. याचा त्रास शेवटी तुम्हालाच होईल. दिलेले काम कंटाळा म्हणून टाळू नका, ते तुमच्यासाठीच नुकसानकारक ठरेल. घरात वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणालाही वाईट शब्द बोलू नका. तुमचे स्पष्ट बोलणे कधी कधी लोकांना दुखावते. संध्याकाळी एखाद्या कार्यक्रमात जायची संधी मिळेल, पण तिथे जास्त मिरवू नका. सरकारी नोकरीत असाल तर दिवस भरलेला असेल.

मूलांक 3 – जास्त उत्साह नको

मंगळवारची सुरुवातच थोडी टेन्शनने होईल. एकामागून एक कठीण कामे येतील, त्यामुळे चिडचिड होईल. पण घाबरू नका, शांत डोक्याने काम करत राहा. दिवसाच्या शेवटी तुम्हाला यश नक्की मिळेल. प्रेमाच्या बाबतीत जास्त घाई करू नका. अति उत्साहात जाऊन काही बोललात किंवा केलात तर त्याचे परिणाम वाईट होतील.

मूलांक 4 – रागावर कंट्रोल ठेवा

आज तुमचे बोलणे लोकांना खूप आवडणार आहे. तुम्ही चांगले बोलता म्हणून सगळे तुमचे कौतुक करतील. पण घरात मात्र वादाचे वातावरण असणार आहे. घरातल्या भांडणाचा परिणाम तुमच्या कामावर होऊ देऊ नका. घरात शांतता कशी राहील हे बघा. राग आणि चिडचिड यावर ताबा ठेवा, नाहीतर मित्रांसोबत पण भांडण होऊ शकते.

मूलांक 5 – काम वेळेत पूर्ण करा

आज मित्रांबरोबर फिरण्यापेक्षा घरच्यांबरोबर वेळ घालवा. कुटुंबासोबत राहिल्याने मनाला शांत वाटेल. जुन्या मित्रांची भेट होईल त्यामुळे दिवस आनंदी जाईल. जी कामे अर्धवट राहिली आहेत ती पूर्ण करा. दुखापत होण्याची थोडी भीती आहे, त्यामुळे जरा जपून राहा आणि तब्येतीकडे लक्ष द्या.

मूलांक 6 – संयम ठेवा

आज घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. संयमाने वागा हेच तुमच्यासाठी चांगले राहील. पैशाच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. कोणीतरी तुमच्या कामात अडथळा आणू शकते, पण तुम्ही शांत राहिलात तर सगळे व्यवस्थित होईल. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल.

मूलांक 7 – नवीन संधी मिळेल

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. एखादी नवीन संधी दार ठोठावेल. नोकरीत किंवा व्यवसायात पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होईल. प्रवासाचा योग आहे, पण प्रवासात काळजी घ्या. मनातले विचार स्पष्ट ठेवा.

मूलांक 8 – कामात अडथळे

आज कामात थोडे अडथळे येतील. ज्येष्ठ लोकांची बोलण्याकडे दुर्लक्ष करत आपल्या काम वेळेत करा. पैशाची आवक कमी आणि जावक जास्त असणार आहे. संध्याकाळनंतर परिस्थिती थोडी सुधारेल.

मूलांक 9 – वेग वाढेल, तणाव कमी होईल

मूलांक 9 वाल्यांसाठी आजचा दिवस एकदम भारी आहे. कामाचा वेग वाढणार आहे आणि जे टेन्शन होते ते कमी होईल. तुम्ही जे काम हातात घ्याल ते पटकन पूर्ण होईल. घरात आनंदी वातावरण राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Numerology horoscope today mulank 1 to 9 gajakesari yoga rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • daily horoscope
  • horoscope marathi
  • numerology

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.