फोटो सौजन्य-pinterest
२०२६ या नव्या वर्षाचा पहिला महिना आता शेवटाकडे झुकू लागला आहे. जानेवारीत ग्रहांच्या बदलत्या हालचालींमुळ अनेकांच्या आयुष्यात चढ-उतार पाहायला मिळाले. काहींसाठी हा महिना आव्हानांचा ठरला, तर काहींना अपेक्षित यश मिळाले. मात्र ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिले असता, येणारा फेब्रुवारी महिना अधिक सकारात्मक आणि फलदायी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रहांच्या विशेष योगामुळे काही निवडक राशींच्या नशिबात मोठे बदल घडू शकतात. विशेषतः शनि आणि सूर्य यांच्या प्रभावामुळे चार राशींसाठी फेब्रुवारी २०२६ हा सुवर्णकाळ ठरणार असल्याचे ज्योतिषी सांगतात.
फेब्रुवारी महिन्यात शनि आणि सूर्याची स्थिती काही राशींसाठी अत्यंत अनुकूल राहणार आहे. न्याय, शिस्त आणि परिश्रमाचे प्रतीक असलेला शनि तसेच आत्मविश्वास आणि नेतृत्व दर्शवणारा सूर्य या दोघांच्या शुभ संयोगामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि सामाजिक प्रतिष्ठा या सर्व बाबींमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात.
मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा महिना दिलासा देणारा ठरेल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. पूर्वी अडलेले पैसे किंवा थकीत देणी परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना जबाबदारी वाढण्यासोबतच पदोन्नती किंवा मान-सन्मान मिळू शकतो.
मिथुन राशींसाठी फेब्रुवारी हा बदल घडवणारा महिना ठरणार आहे. उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याचे संकेत आहेत. भागीदारीत केलेल्या कामातून फायदा होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय, नोकरी किवा व्यवहारातून चांगला लाभ मिळू शकतो.
तूळ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना आर्थिकदृष्ट्या समाधानकारक ठरणार आहे. घर, जमीन किंवा स्थावर मालमतेशी संबंधित व्यवहार यशस्वी होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणाऱ्यांना विशेषतः शेअर बाजारातून चांगला परतावा मिळू शकतो. खर्चावर नियंत्रण राहील आणि बचतीकडे अधिक लक्ष देता येईल.
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी महिन्यात आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. महत्त्वाचे निर्णय घेण्याची क्षमता वाढेल, कामाच्या ठिकाणी तसेच समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नव्या गुंतवणुकीच्या संधी समोर येऊ शकतात आणि भविष्यासाठी ठोस आर्थिक नियोजन करता येईल.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: ज्योतिषानुसार ग्रहांचा विशिष्ट योग किंवा संयोजन जेव्हा राशींवर सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो तेव्हा ते शनि‑सूर्य योग/चतुर्ग्रही योग म्हणून ओळखले जाते — ज्याचा प्रभाव धन, यश, प्रतिष्ठा आणि प्रगतीमध्ये दिसू शकतो.
Ans: सामान्यपणे हा योग सूर्य, बुध, मंगल, शुक्र यांचा सकारात्मक प्रभाव ज्यांना मिळतो त्यांच्या जीवनात कामात गती, आर्थिक उन्नती आणि सामर्थ्य वाढू शकते. काहींना समस्यांचा सामना करावा लागू शकतो पण योग्य नियोजनांनी फायदा होऊ शकतो.
Ans: शनि‑सूर्य योग मेष, मिथुन, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे






