फोटो सौजन्य- pinterest
बुधवार, 9 जुलैचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. चंद्र गुरु राशीच्या धनु राशीत संक्रमण करणार आहे. बुधवार असल्याने दिवसभर बुध ग्रहाचा प्रभाव राहील. गुरु आणि चंद्र यांच्यामध्ये संसप्तक योग तयार होईल. तसेच गजकेसरी राजयोग तयार होईल. मूळ नक्षत्रामुळे ब्रह्म योग देखील तयार होणार आहे. गजकेसरी योगामुळे मिथुन राशीसह या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली ठरणार आहे. तसेच या लोकांना कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील. कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष असणार आहे. या लोकांना नशिबाची साथ मिळेल. तुमची नियोजित काम पूर्ण होईल. आर्थिक लाभ होऊ शकतात. व्यवसायनिमित्ताने लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. तुम्ही दानधर्म करु शकता. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. नातेसंबंधामध्ये गोडवा राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मकतेचा अधिक परिणाम देणारा राहील. व्यवसायातून भागीदारीत काम करत असाल तर आजचा दिवस फायदेशीर राहील. करिअरच्या दृष्टीनेही आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. तुमच्या वरिष्ठांकडून अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळेल. यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. या लोकांना आर्थिक लाभ होईल.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला हुशारीने निर्णय घ्यावा लागेल. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली असाल तर तुम्हाला फायदा होईल. चित्रपट, नृत्य, संगीत, ग्राफिक डिझायनिंग इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष यश मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहणार आहे.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली राहणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. जर तुम्ही कोणतेही काम प्रलंबित असल्यास ती पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. जकारणाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या कुटुंबासह तीर्थयात्रेला जाण्याची योजना आखू शकता.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला पैसे कमविण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहील. नोकरी करणाऱ्यांना काही मोठी जबाबदारी मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)