फोटो सौजन्य- istock
बुधवार, 9 जुलैचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी विशेष राहणार आहे. मंगळ हा 9 क्रमांकाचा स्वामी आहे. याचा प्रभाव सर्व लोकांवर असलेला दिसून येईल. बुधाची संख्या 5 मानली जाते. कामाच्या ठिकाणी काही गोष्टींच्या बदलाला सामोरे जावे लागू शकेल. जुन्या कामामध्ये काही लोकांना यश मिळू शकते. मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित स्वरुपाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तसेच तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन संधी देखील मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या.
मूलांक 2 असलेल्या लोकांना अनेक प्रकारच्या भावना निर्माण होऊ शकतात. या लोकांना व्यवसायामध्ये अनेक फायदे होतील. एखाद्या जुन्या मित्रांशी तुमची भेट होईल.
मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळू शकतो, ज्यामुळे ताण कमी होईल. शिक्षण, सल्लागार किंवा प्रशासनाशी संबंधित लोक काहीतरी साध्य करू शकतात.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी प्रयत्न करूनही तुमची महत्त्वाची कामे अडकू शकतात. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांकडे लक्ष द्यावे लागेल.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. प्रवास, संभाषण, बैठका किंवा ऑनलाइन नेटवर्किंगद्वारे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. आरोग्य सामान्य राहील.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. घराची सजावट, कला किंवा सौंदर्याशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला यश मिळू शकते. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्हाला चांगला फायदा होईल. कुटुंबात उत्सवाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. ध्यान केल्याने मन शांत होईल आणि तुमची अंतर्ज्ञान बळकट होईल. तुम्हाला गुंतागुंतीच्या समस्यापासून तुमची सुटका होईल. धार्मिक कार्यक्रमात तुम्ही सहभाग घ्याल.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आज भरपूर जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागू शकतात. तुम्हाला कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. आर्थिक बाबतीतही सावधगिरी बाळगा.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील, आजचा दिवस उत्साहाचा राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी जुन्या कामात यश मिळू शकते. सैन्य, पोलिस आणि संरक्षण क्षेत्रात काम करणारे आज चांगले काम करतील
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)