फोटो सौजन्य- pinterest
सोमवार 20 ऑक्टोबर आणि कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी. आज चंद्र आपले संक्रमण कन्या राशीमध्ये करणार आहे. तसेच शुक्र आणि बुध ग्रहाच्या मधोमध राशीपरिवर्तनामुळे राजयोग तयार होईल. तसेच बुद्ध आणि सूर्याच्या युतीमुळे दिवाळीच्या दिवसात बुधादित्य योग तयार होईल. गुरु ग्रहाच्या संक्रमणामुळे हंस राजयोग तयार होईल. त्यासोबतच नक्षत्रामुळे सर्वार्थ सिद्ध योग आणि अमृत सिद्धी योग तयार होणार आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी या शुभ योगांचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
मेष राशींच्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. धोनी तारा सोबत आजचा दिवस चांगला राहील. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित लाभ मिळेल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभाग होऊ शकता. एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
मिथुन राशींच्या लोकांसाठी दिवाळीचा दिवस चांगला जाणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ शकते. तसेच अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
सिंह राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकता. मित्रांकडून चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहील. धार्मिक कार्यक्रमांमध्ये आवड निर्माण होईल.
तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुमची नवीन ओळख निर्माण होईल. तुमची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यवसायात तुम्हाला यश आणि प्रतिष्ठा मिळेल. जे लोक सरकारी सेवेमध्ये आहे त्यांना नवीन जबाबदारी मिळू शकतात. वैवाहिक जीवन चांगले जाईल तसेच आर्थिक स्थिती चांगली राहील. आजारी लोकांचे आरोग्य सुधारणा होईल.
धनु राशींच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. आर्थिक संधी मिळतील. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा सल्ला मिळेल. व्यवसायामध्ये नवीन ऑर्डर मिळेल. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतील. जुन्या गुंतवणुकीतूनही तुम्हाला फायदा होईल. जोडीदारासोबत तुम्ही धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)